English School Admission : इंग्रजी माध्यम प्रवेशासाठी 15 मेपर्यंत अर्ज करावेत; प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांचे आव्हान

School Admission : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे.
English School Admission
English School Admission esakal

English School Admission : आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी १५ मेपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, गडकरी चौक, नाशिक येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी केले आहे. (nashik Apply for English medium admission by May 15 )

पहिलीत प्रवेश घेण्यासाठी उपरोक्त नमूद कार्यालयात पाल्याचा जन्मदाखला व पालकाचा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यावर प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सादर करावा. पात्र अर्ज असणाऱ्या पालकांनी व पाल्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी पेठ, इगतपुरी, सिन्नर, नाशिक तालुक्यांतील पालकांनी व पाल्यांनी २४ मे; तर त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला, निफाड तालुक्यांतील पालक व पाल्यांनी २५ मेस एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सकाळी दहाला उपस्थित राहावयाचे आहे.  (latest marathi news)

English School Admission
School Admission : प्रवेशावेळी वर्ण-वंशाच्या नोंदीवर ‘फुली’; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मंजूर लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. कागदपत्र तपासणीसाठी येण्याचा व जाण्याचा व इतर कोणत्याही प्रकारचा खर्च अनुज्ञेय नाही, तसेच जिल्ह्याचे इतर प्रकल्प कार्यालयाच्या क्षेत्रातील अर्ज त्या त्या संबंधित प्रकल्प कार्यालयात स्वीकारले जातील, असेही रहमान यांनी सांगितले. आदिम/ अनुसूचित जमातीच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

English School Admission
English School Admission : इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 30 जून पर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com