Summer Skin Care Tips : रणरणत्या उन्हात अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून असा करा आपल्या त्वचेचा बचाव!

Health Care : होळी, रंगपंचमीनंतर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा आता चाळिशी ओलांडण्याच्या तयारीत आहे
Summer Skin Care Tips
Summer Skin Care Tipsesakal

Summer Skin Care Tips : होळी, रंगपंचमीनंतर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा आता चाळिशी ओलांडण्याच्या तयारीत आहे. तापमानात झालेल्या अचानक वृद्धीमुळे उन्हात बाहेर पडणाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होते. उन्हात जाणे टाळता येत नाही, पण बचाव जरूर करता येतो. (Summer Skin Care Tips)

म्हणूनच मुलींचा फॅशन मोर्चा आता सनकोट, हॅण्डग्लोज, रेडिमेड स्टोल खरेदीकडे वळला आहे. उन्हाची तीव्रता अनुभवल्यावर सनकोटला नाक मुरडणाऱ्या मुलींनी सनकोट वापरायला सुरवात केली आहे. (Nashik Protect your skin from cotton clothes marathi news)

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वाधिक नुकसान उन्हाळ्यात होते. त्वचेतील मेलॅनिन नावाचे द्रव्य (ज्या द्रव्यांमुळे त्वचा विशिष्ट वर्णाची दिसते) असल्यामुळे गोऱ्या वर्णाच्या व्यक्तींना उन्हाचा त्रास अधिक जाणवतो. उन्हात गेल्यावर त्वचेत अधिक प्रमाणात मेलॅनिन आपोआप तयार होते.

त्यासाठी सनस्क्रीन लोशन बरोबर सुती कपड्यांचा आधार घ्यावा लागतो. ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे तीव्र उन्हाचा सामना करताना सनबर्नचा धोका वाढतो. नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरुणींना दुचाकी चालवताना उन्हासोबत प्रदूषणाचा सामना करावा लागतो.

सिग्नलवर, ट्राफिकमध्ये अधिक वेळ थांबल्यावर कोणताही ड्रेस, साडी परिधान केला असला तरी हात, मान पूर्णपणे झाकली जात नाही. त्यातून त्वचा कोरडी होऊन काळपटपणा येतो शिवाय त्वचेची आग होते. अशा परिस्थितीत बाहेर जाणे टाळता येत नाही पण, हॅण्डग्लोज, स्टोल, सनकोटसारखे पर्याय उन्हापासून संरक्षण करतात. कारण उन्हाचा थेट परिणाम कपड्यांवर होतो.

Summer Skin Care Tips
Summer Care: उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यास काय करावे?

सूतीमध्ये नावीन्यता

साधारण स्टोल घेतल्यानंतर एकसारखा करून तो बांधावा लागतो पण, रेडिमेड वेलक्रो टचमुळे स्टोल बांधण्याची गरज पडत नाही तर केवळ अडकवावे लागतात. त्याचबरोबर हॅण्डग्लोजमध्ये दोन साइज मिळतात त्यात हात आणि बोटांच्या आकारानुसार निवड करता येते. त्यामध्ये केवळ पांढरा आणि स्कीन असे दोनच रंग मिळतात.

तसेच साधे सनकोट ट्रेंडी दिसण्यासाठी स्कीन फ्रेंडली मटेरिअल वापरले जाते. ठिपक्यांची, हार्टशेप, फुलांच्या नक्षीच्या सनकोटची सध्या चलती आहे. सनकोटच्या नक्षीत वैविध्य असले तरी पांढऱ्या रंगाला पसंती दिली जाते. सध्यातरी सनकोटवर पांढऱ्या रंगाचे वर्चस्व आहे.

"दुचाकी चालवताना स्टोल, हॅण्डग्लोज, सनकोट सर्वच गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे या तिन्ही वस्तूंना मागणी आहे. सनकोटमध्ये कॉटन, चिकन, केमरिक कॉटन त्यामध्ये प्रिंटेड, प्लेन असे सनकोट उपलब्ध आहेत. पाच बटणांचे, दोन खिशांचे, समोरून बटणाऐवजी झिप, बाह्यांना फ्रील आणि पाठीमागे कॅप असलेले सनकोटचे नवनवीन प्रकार आले आहेत. जे साधारणतः २०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत." - मिहीर शहा, रिंकूज एनएक्स

Summer Skin Care Tips
Summer Skin Care: घाम, उन्हाच्या चटक्याचा त्वचेवर परिणाम, अशी घ्या खास काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com