PSI Success Story : मुल्हेरमधील घड्याळ विक्रेत्या ‘गौरव’ ची; पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

Success Story : प्रचिती मुल्हेर येथील रहिवासी असलेल्या आठवडे बाजारांमध्ये घड्याळ विक्री, दुरुस्तीचे दुकान थाटणाऱ्या तरुणाच्या लखलखत्या यशातून सिद्ध झाली आहे.
Gaurav Vetal (Chowdhary) Sub-Inspector of Police, Mulher
Gaurav Vetal (Chowdhary) Sub-Inspector of Police, Mulheresakal

PSI Success Story : गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने तरुणांना नोकऱ्या मिळणे, मृगजळ ठरत आहे. परंतु परिस्थितीची जाणीव, सातत्यपूर्ण अभ्यास करण्याची मानसिकता, स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल तर यश आपल्या पायाशी लोटांगण घालते, याची प्रचिती मुल्हेर येथील रहिवासी असलेल्या आठवडे बाजारांमध्ये घड्याळ विक्री, दुरुस्तीचे दुकान थाटणाऱ्या तरुणाच्या लखलखत्या यशातून सिद्ध झाली आहे. (nashik PSI Success Story Gaurav watch seller in Mulher appointed in post of Sub Inspector of Police marathi news)

पोलिस उपनिरीक्षकपदी नुकतीच निवड झालेल्या गौरव वेताळची ही संघर्षमय यशोगाथा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुल्हेर (ता. बागलाण) येथील शेतकरी कुटुंबातील कला शाखेचा विद्यार्थी गौरव वेताळ (चौधरी) याने दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातल्याने पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात शिक्षण घेवून इतर मागास प्रवर्गात राज्यात चौथी रँक मिळवून त्याने यश अधोरेखित केले आहे. मुल्हेर येथील शिवाजी वेताळ-चौधरी परिवाराचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून गौरवच्या आई छाया गृहिणी. शेती व्यवसायसोबत घराला आर्थिक हातभार लावण्याच्या हेतूने गौरव याने आठवडे बाजारात घड्याळाचे दुकान सुरू केले.

आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, अशी लहानपणापासून त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. वेताळ कुटुंबाच्या संघर्षमय आयुष्याला मोठा मुलगा गोकुळ रेल्वे पोलिस दलात उपनिरीक्षक झाल्यानंतर दिलासा मिळाला. गौरवचे प्राथमिक शिक्षण मुल्हेरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षणही त्याने मुल्हेरच्या माध्यमिक त्याने पूर्ण केले. (latest marathi news)

Gaurav Vetal (Chowdhary) Sub-Inspector of Police, Mulher
PSI Success Story : वाखारीच्या शलाका शिरसाठची पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी!

त्यानंतर ताहाराबाद येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात पदवीच्या कला शाखेचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची परिपूर्ण जाणीव गौरवला होती. ज्ञानार्जनासोबत आपल्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी गौरवने वडिलांचा घड्याळ विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे सांभाळला.

२६ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी नाशिक गाठून सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. त्यानंतर २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाची पूर्व व मुख्य परीक्षेत त्याने यश मिळविले. परंतु शारीरिक चाचणी परीक्षेवेळी धावताना पाय फ्रॅक्चर झाल्याने यशाने हुलकावणी दिली. तरीही खचून न जाता २०२१ मध्ये पुन्हा एमपीएससीची परीक्षा देवून देदीप्यमान यश गौरवने मिळविले आहे.

''भाऊ पोलिस दलात अधिकारी असल्याने खाकीचे आकर्षण होते. माझ्या संघर्षमय यशात आई-वडील, गुरुजन, मोठा भाऊ गोकुळ, वहिनी प्रियांका यांचा मोलाचा वाटा आहे. कोणताही क्लास न लावता दिवसाकाठी किमान पंधरा-सोळा तास अभ्यास करून जिद्द, चिकाटी, स्वयंप्रेरणेने यश मिळविले आहे.''-गौरव वेताळ (चौधरी) पोलिस उपनिरीक्षक, मुल्हेर

Gaurav Vetal (Chowdhary) Sub-Inspector of Police, Mulher
Success Story : माधवगिरी मागणाऱ्या कुटुंबातील तरुण PSI! राजापूर येथील जनार्धन बैरागीचे देदीप्यमान यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com