Nashik: ॲड. जायभावे लिखित ‘भारतीय संविधानातील लोकतंत्र’चे उद्या प्रकाशन! सर्वोच्च न्यायालयाचे न्या. गवई, वराळेंची उपस्थिती

Nashik News : ॲड. जयंत जायभावे लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात होते आहे.
Adv. Jayant Jaybhave
Adv. Jayant Jaybhaveesakal

नाशिक : संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘भारतीय संविधानातील लोकतंत्र’ या ॲड. जयंत जायभावे लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात होते आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई उपस्थित राहणार असून, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्ना वराळे यांचा यावेळी विशेष सत्कारही याप्रसंगी करण्यात येणार आहे. (Nashik bhartiya samvidhanache loktantra by adv Jaybhave marathi news)

Adv. Jayant Jaybhave
Manoj Jarange: उद्या मराठा आंदोलनासंदर्भात निर्णायक बैठक; जरांगेंची माहिती

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा, नाशिक बार असोसिएशन आणि गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान अमृत महोत्सव बीसीएमजी २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. मकरंद कर्णिक, राज्याचे ॲव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, उपाध्यक्ष एस. प्रभाकरन्‌, गोखले एज्युकेशनच्या सचिव डॉ. श्रीमती दीप्ती देशपांडे यांची उपस्थिती असणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक बार कौन्सिलतर्फे करण्यात आलेले आहे. (Latest Marathi News)

Adv. Jayant Jaybhave
Cm Eknath Shinde : म्हाडाच्या माध्यमातून प्रत्येकाला परवडणारे घर देणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com