Loksabha Election: अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना भाव! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, पदाधिकाऱ्यांकडून विचारणा

Nashik Loksabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून, निफाड मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत.
Politician
Politicianesakal

पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने दीड-दोन वर्षांपासून अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना चांगलाच भाव आला असून, नेते व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते.

नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारही विचारत नसल्याने कार्यकर्ते जवळपास गायब झाले होते. आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांनी सुगीचे दिवस येणार आहेत. (Nashik Political Lok Sabha elections marathi news)

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून, निफाड मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कामाला येणार आहेत.

आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या कार्यकर्त्यांची आठवण नेत्यांना होत आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगात नेतेमंडळी आता आवर्जून हजेरी लावत आहेत. इच्छुक उमेदवार प्रकाशझोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत. दिडोंरी लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्षाला अथवा गटाला उमेदवारी मिळावी, यासाठी कंबर कसली आहे. दावे, प्रतिदावे केले जात आहेत.

सर्वच कार्यक्रमांत हजेरी

साखरपुडा आणि लग्न सोहळ्यास पुढारी आणि नेतेमंडळींची गर्दी वाढली आहे. लग्नाचा मुहूर्त साधताना पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. लग्नाचा मुहूर्त चुकला, तरी लग्न सोहळ्यास हजेरी लावण्याकडे कल वाढला आहे. दशक्रिया विधीसाठी गर्दी वाढली आहे.

एरवी कोणाचे निधन झाले, याकडे लक्ष न देणारे नेते सांत्वन करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घराचा उंबरा चढत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी विविध उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत.

नेते ॲक्टिव्ह

सद्यःस्थितीत नगरपालिका निवडणुका नसल्या, तरी लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही बाजूचे नेते ॲक्टिव्ह झाले आहेत. महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तालुका पातळीवर ॲक्टिव्ह झाले आहेत.

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी एकत्रित विविध कार्यक्रमांना हजेरी लावून वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे तालुक्यातील राजकारण तापत आहे. (Latest Marathi News)

Politician
Loksabha Elections : 'या' चार लोकसभा मतदारसंघांत आमचाच विजय होणार; जयंत पाटलांचा मोठा दावा

उमेदवारीसाठी रस्सीखेच

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार करीत आहेत. भाजपकडून एन. डी. गावित, कविता राऊत यांची नावे चर्चेत आहेत. श्री. गावित यांनी संपर्क दौरेही सुरू केले आहेत. मात्र, डाॅ. पवार यांची दावेदारी अधिक मजबूत असल्याचे दिसते. महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव भगरे यांचे नाव पुढे आले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भगरे यांनी भेट होऊन सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजपचे शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मतावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तारणहार ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, महायुतीमुळे दिंडोरी लोकसभा अंतर्गत येणारे सर्वच आमदार भाजपच्या पाठीशी असतील.

आमदार बनकर-कदम यांच्यासाठी विधानसभेची लिटमस टेस्ट

महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने निफाड विधानसभा मतदार संघात पुन्हा जुन्याच लढती रंगणार आहेत. महाविकास आघाडीच्या सत्तेत राजकीयदृष्ट्या कात्रीत सापडलेले माजी आमदार अनिल कदम राज्यातील बदललेल्या सत्ताकारणाने बाहेर पडलेले दिसतात. महायुतीचे आमदार दिलीप बनकर व महाविकास आघाडीकडून अनिल कदम अशी जुनीच पारंपरिक लढत रंगणार आहे.

पिंपळगाव बाजार समितीचे संचालक यतीन कदम, ‘मविप्र’चे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची नावेही चर्चेत आहेत. तत्पूर्वी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची पायाभरणी होणार आहे. बनकर-कदम यांच्यासाठी लोकसभेचा रणसंग्राम लिटमस टेस्ट असणार आहे.

Politician
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 22 हजार कर्मचारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com