Rahul Gandhi Nashik Daura : राहुल गांधी चौक सभेतून घालणार नाशिककरांना साद; ठिकठिकाणी होणार स्वागत

Rahul Gandhi Nashik Daura : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्यांत नाशिक शहरात येत आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal

Rahul Gandhi Nashik Daura : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्यांत नाशिक शहरात येत आहे. ओझर मार्गे त्यांचे नाशिक शहरात आगमन होणार असून द्वारका मार्गे यात्रा दूध बाजारातून शालीमार चौकात येईल. यात ते नागरिकांशी संवाद साधतील. शालीमार येथील चौक सभेतून राहुल गांधी नाशिककरांना साद घालतील. दरम्यान, राहुल गांधी यांची पदयात्रा, सभा यांचे अधिकृत वेळापत्रक पक्षाकडून जाहीर झाले आहे. (Nashik Rahul Gandhi will address people of Nashik marathi news)

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात असून बुधवारी (ता. १३) रात्री त्यांचे मालेगाव येथे आगमन होईल. या यात्रेत ते शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक व युवती यांच्याशी ठिकठिकाणी संवाद साधणार आहे. ओझर मार्गे दुपारी त्यांची पदयात्रेचे नाशिक शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका सर्कल येथे आगमन होईल.

तेथून पुढे सारडा सर्कल येथे त्यांचे आगमन होऊन सर्कलला वळसा घालत ही पदयात्रा मुस्लिम समाज बहुसंख्याक असलेल्या जुन्या नाशिकमधील दूध बाजार चौकापर्यंत येईल. वाटेत मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. मेनरोडकडे ही यात्रा मार्गक्रमण करेल. गाडगे महाराज पुतळ्यापासून यात्रा शालिमारला पोचेल. (latest marathi news)

Rahul Gandhi
Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्ष राज्यस्तरीय मेळावा

तेथे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील. या ठिकाणी चौक सभेला राहुल गांधी संबोधित करतील. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होईल. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतील. येथे आदिवासी समाजाचा मेळाव्याला ते हजेरी लावतील.

त्यानंतर रात्रीचा मुक्काम पालघर जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासी पाड्यावर करतील. जिल्हा - शहर काँग्रेसकडून पदयात्रा स्वागताची तयारी सुरू असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले.

काळाराम मंदिर दर्शनाबाबत संभ्रम

सुरूवातीस राहुल गांधी यांच्या यात्रेत पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिर भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु नव्या दौऱ्‍यात काळाराम मंदिर दर्शनाचा उल्लेख नसल्याने संभ्रम वाढला आहे. तर दुसरीकडे शालिमार येथे यात्रा पोचल्यानंतर वाहनाने राहुल गांधी काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी जातील, असे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi, Sharad Pawar Nashik Daura: शरद पवार, राहुल गांधी यांच्या सभेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार : पानगव्हाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com