Nashik News : शहरात प्लॅस्टिक विक्रेत्यांवर छापे; दिडशेपैकी 11 जागांवर प्लॅस्टिक विक्री

Nashik : महापालिकेकडून प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरकर्त्यांवर धाडी टाकण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Special team personnel conducting raids on banned plastic sellers in the city.
Special team personnel conducting raids on banned plastic sellers in the city.esakal

Nashik News : महापालिकेकडून प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरकर्त्यांवर धाडी टाकण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. शहरात दिडशे ठिकाणी विशेष पथकाच्या माध्यमातून छापे टाकण्यात आले. त्यापैकी अकरा ठिकाणी प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरकर्ते आढळून आले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्य शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, हाताळणी व साठवणूक अधिसूचना,२०१८ च्या अंमलबजावणीचे आदेश काढले होते. (nashik Raids on plastic dealers in city by municipal corporation marathi news)

या आदेशानुसार एकल वापराच्या प्लॅस्टिकवर (सिंगल युज) बंदी घातली आहे. एकल वापराच्या प्लॅस्टिकवर असलेल्या बंदीबाबत शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठा, महत्त्वाचे रस्ते आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी तसेच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय विशेष पथके तयार करण्यात आले.  (latest marathi news)

Special team personnel conducting raids on banned plastic sellers in the city.
Nashik News : गो सेवा समितीतर्फे जनावरांच्या पाण्याची सोय! कळवण शहरात ठिकठिकाणी बसविल्या सिमेंटच्या टाक्या

विशेष पथकांच्या मार्फत शहरात १५० ठिकाणी तपासणी करण्यात आली. प्रतिबंधित प्लॅस्टिक वापराबाबत एकूण अकरा केस करण्यात आल्या. त्यांच्याकडे ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे विभागामार्फत प्लास्टिक वापराच्या बंदी बाबत जनजागृती करण्यासाठी शहरात फलक लावण्यात येणार आहे.

Special team personnel conducting raids on banned plastic sellers in the city.
Nashik News : अनधिकृत पाणीउपसा केल्यास कारवाई : जिल्‍हाधिकारी शर्मा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com