esakal | Nashik Rain: इगतपुरीसह पेठ सुरगाण्यात अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

nashik rain

Nashik Rain: इगतपुरीसह पेठ सुरगाण्यात अतिवृष्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: वरुणराजाची मेहेरबानी सुरु असून आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात इगतपुरीसह पेठ अन सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टी झाली. तसेच त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४.५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्रच्या पुणे विभागातर्फे मंगळवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवत असताना उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी (ता. १४) कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आदिवासी भागात चांगल्या पावसाची चिन्हे दिसताहेत.

तसेच मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस, तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाचा अंदाज विभागाचा आहे. बुधवारनंतर (ता. १५) पावसाचा जोर कोकण वगळता राज्यात इतरत्र कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात झालेला पाऊस तालुकानिहाय असा, नाशिक-११, इगतपुरी-९३, दिंडोरी-२८, पेठ-९७, मालेगाव-१, कळवण-२, सुरगाणा-७१.१, देवळा-२.३, निफाड-३, सिन्नर-२२, येवला-१०. चोवीस तासात नांदगाव, चांदवड, बागलाणमध्ये पावसाची उघडीप राहिली. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ९५.७१ टक्के पावसाची नोंद झाली होती.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

नाशिक- ५०.८० कळवण-७१.२९

इगतपुरी- ९१.२० बागलाण- ८६.०१

दिंडोरी- ६५.९७ सुरगाणा- ९३.६७

पेठ- ९०.७६ देवळा- १०१.८२

त्र्यंबकेश्‍वर- ६९.२६ निफाड- ९८.८०

मालेगाव- ११५.६० सिन्नर- ६३.९४

नांदगाव- १३४.७४ येवला-८४.५४

(चांदवड तालुक्यात सर्वात कमी ४७.४० टक्के पाऊस)

loading image
go to top