Nashik Rain Update: पालखेडमधून डाव्या कालव्याला पूरपाणी; वाघाड, पुणेगाव ओव्हरफ्लो

Flood water released in left channel of Palkhed Dam
Flood water released in left channel of Palkhed Damesakal

Nashik Rain Update : दिंडोरी तालुक्यातील चांगला पाऊस झाल्याने वाघाड व पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे पालखेड धरणातून डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे.

शहराची पाणीटंचाई पाहता सोडलेले पूरपाणी महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे. (Nashik Rain Update Floodwater from Palkhed to Left Canal Waghad Punegaon overflow)

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. दिंडोरी तालुक्यात चांगला पाऊस झाला असल्यामुळे वाघाड व पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाली आहेत.

त्यामुळे या धरणातून पालखेड धरणात पाणी सोडण्यात आले असून या धरणातून मनमाड शहरासाठी डाव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज मनमाड पालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावात पोचले आहे.

या तलावातून पाणी पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात घेतले जाईल. त्यामुळे मनमाड शहराचा पाणीपुरवठा काही दिवस सुसह्य होणार आहे, पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पावसामुळे धरणे भरभरून वाहू लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Flood water released in left channel of Palkhed Dam
Nashik Water Crisis: ‘एक गाव एक गणपती’ मोहीम सर्वत्र राबवा; गावागावातून ग्रामस्थांचीही मागणी

पालखेड धरण जवळपास ८४ टक्के भरले आहे, त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाटोदा येथील साठवणूक तलावातून पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी २७० अश्वशक्तीचे ३ आणि २०० अश्वशक्तीचे २ पंप सज्ज आहेत.

त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. पालखेड धरणाचे पूर पाणी सोडण्यात येणार असल्याने पाटोदा येथील ६ पंपांना आईल लेव्हल करून घेतली.

पूर्ण यंत्रणेची तपासणी केली. हे पूरपाणी वागदर्डी धरणात घेतले जात आहे. या पूरपाण्यामुळे मनमाड शहराची पाणीटंचाईची दाहकता काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

" पालखेड धरणातून सोडण्यात आलेले पूरपाणी मंगळवारी (ता.१२) येथे पोहचले असून ते तलावात पोचल्यानंतर धरणासाठी उपसा केले जाईल. या पूरपाण्यामुळे मनमाडच्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात होणार आहे." - शेषराव चौधरी, मुख्याधिकारी.

Flood water released in left channel of Palkhed Dam
Water Crisis: पावसाळ्याच्या शेवटलाही जलस्रोत कोरडेठाक! दुष्काळाच्या माहेरघरी आताच पाणीबाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com