Alphonso Mango : फळांच्या राजाचे कोकणातून शहरात आगमन; कालिका मंदिरात आंबा महोत्सव

Alphonso Mango : शहरातील कालिका मंदिराच्या प्रांगणात कोकणच्या भूमीत नैसर्गिकरीत्या गवतात पिकविलेला हापूस आंबा नाशिककरांसाठी दाखल झाला आहे.
Hapus for sale
Hapus for saleesakal

Alphonso Mango : गोड, रसाळ चवीने खवय्यांना तृप्त करणाऱ्या फळांच्या राजाचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील कालिका मंदिराच्या प्रांगणात कोकणच्या भूमीत नैसर्गिकरीत्या गवतात पिकविलेला हापूस आंबा नाशिककरांसाठी दाखल झाला आहे. सध्या सहाशे ते बाराशे रुपये डझनापर्यंत हापूस आंब्यांचा भाव असून काही दिवसांत आंब्याच्या दरांत थोड्या प्रमाणात बदल होतील अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. (nashik ratnagiri Alphonso Mango Festival at Kalika Temple marathi news)

आंबा आवडत नाही असा व्यक्ती सापडणे कठीणच. त्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटतो तो कोकणातील हापूस आंबा. नाशिककरांना शहरातच कोकणच्या हापूस आंब्याचा गोडवा चाखता यावा यासाठी कोकणातील बांधव हापूस आंबा विक्रीसाठी शहरात आंबे विक्रीसाठी आले आहेत. यंदा कोकणात सर्वत्र आंब्याचा बहर चांगला असल्याने आंब्याचे दर मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी आहेत.

एक डझनासाठी सहाशे ते १२०० रुपयांपर्यंत भाव आहे, तर पाच डझन आंब्यांच्या एका पेटीचा भाव साडेचार ते साडेपाच हजार रुपये इतका आहे. सध्या रत्नागिरी, देवगड हापूस विक्रीसाठी उपलब्ध असून एक आठवड्यानंतर केशर आणि पायरी आंबादेखील शहरात दाखल होईल. एप्रिल महिन्यात कोकणातील आंब्याची आवक थोडी मंदावेल. त्यामुळे या महिन्यात दर वाढतील. मात्र मे महिन्यात ते पुन्हा पूर्वपदावर येतील, अशी माहिती आंबा विक्रेत्या मुसरत काळसेकर यांनी दिली आहे. (latest marathi news)

Hapus for sale
Alphonso Mango : हापूसच्या तीन पेट्यांना २३ हजाराचा भाव

''यंदा कोकणात सुरवातीपासून आंब्याचे उत्पादन चांगले राहिले असून फळ देखील गोड, रसिले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्क्याने भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आंबा शौकिनांनी मनमुराद हापूस आंबे खाण्याचा आनंद घ्यावा.''- मुसरत काळसेकर, आंबा विक्रेत्या, रत्नागिरी.

''रत्नागिरी- देवगड हापूस आंबा नाशिककरांसाठी उपलब्ध आहे. मागील वर्षापेक्षा यंदा भाव कमी असल्याने ग्राहकांचाही प्रतिसाद लाभत आहे.''- रवींद्र कोकरे, आंबे विक्रते, रत्नागिरी.

ऑनलाइन खरेदीला पसंती

कोकणातील हापूस आंब्यांची शहरवासीयांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. शहरात कोकणातून आंबे विक्रीसाठी विक्रेते येतात, मात्र यंदा कोकणातीलच काही विक्रेत्यांनी आंब्यांची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. व्हॉटस्अॅप ग्रुपवर आंब्यांची माहिती, ऑनलाइन रेटिंग, परिचयातील विक्रेत्यांकडील आंबे खरेदीचा अनुभव नागरिक शेअर करत असल्यामुळे नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून खात्रीशीर आंबे मिळत आहेत. त्यामुळे यंदा हापूस आंब्यांच्या ऑनलाइन खरेदीलाही नागरिकांची पसंती मिळत आहे.

Hapus for sale
Alphonso Mango : हापूस आंब्याच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणूक; कसं फसवलं जातं ग्राहकांना? जाणून घ्या..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com