Jalaj sharma
sakal
नाशिक
Jalaj sharma : नाशिकला रेड अलर्ट; जिल्हा प्रशासन 'अलर्ट मोडवर', जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची 'सकाळ'ला माहिती
Nashik Under Red Alert: District Administration on High Alert : भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केल्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा प्रशासन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, पूरस्थितीतील बाधितांना तात्काळ रेस्क्यू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवार (ता. २९) पर्यंत नाशिकला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या कालावधीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असणार आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ल्यावर गर्दी टाळण्याचे निर्देश वन विभागाला दिले आहेत.
