

The Saptashrungi–Nanduri Ghat road has been closed for three days as a precaution against landslides and flooding.
Sakal
वणी (नाशिक) : भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी गड येथील धार्मिक स्थळ आणि सप्तशृंगीगड ते नांदुरी घाट रस्ता ता. ७ जुलै, ८ जुलै आणि ९ जुलै २०२६ या तीन दिवसांसाठी भाविक व नागरिकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने जारी केला आहे.