JEE Advance Exam : जेईई ॲडवान्स्‍डसाठी शनिवारपासून नोंदणी; आयआयटी मद्रासतर्फे आयोजन, 26 मेस होणार परीक्षा

JEE Advanced Exam : आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना जेईई ॲडवान्स्ड या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
JEE Advanced Exam
JEE Advanced Exam esakal

JEE Advanced Exam : आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना जेईई ॲडवान्स्ड या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवार (ता. २७)पासून सुरू होते. २६ मेस राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये पदवी स्‍तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रम (बी. टेक.)करिता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जातील. ( Registration for JEE Advanced exam from Saturday )

या प्रक्रियेंतर्गत यापूर्वी जेईई मेन्‍स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांमध्ये नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीतर्फे घेण्यात आली. जानेवारी सत्राच्‍या परीक्षेचा निकाल यापूर्वीच जाहीर झालेला आहे. एप्रिल सत्रातील परीक्षा पार पडल्‍यावर अंतिम उत्तरतालिका (ॲन्‍सर की) संकेतस्‍थळावर जारी करण्यात आली.

येत्‍या दोन-तीन दिवसांत या परीक्षेचा निकाल तसेच राष्ट्रीय क्रमवारीही जारी केली जाण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेशप्रक्रियेतील पुढील टप्‍पा म्‍हणजे जेईई ॲडवान्स्‍डच्‍या नोंदणीची लगबग येत्‍या आठवड्यात पाहायला मिळेल. शनिवारपासून जेईई ॲडवान्स्‍डचा परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. (latest marathi news)

JEE Advanced Exam
JEE Advanced परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाहीर

जेईई ॲडवान्स्‍ड २०२४ च्‍या महत्त्वाच्‍या तारखा

- परीक्षा अर्ज भरण्याची मुदत : २७ एप्रिल ते ७ मे

- परीक्षा शुल्‍क भरायची अंतिम मुदत : १० मेपर्यंत

- ॲडमिट कार्ड होणार उपलब्‍ध ः १७ ते २६ मेदरम्‍यान

- जेईई ॲडवान्स्‍ड परीक्षेचे आयोजन ः २६ मे

- ॲन्‍सर की व निकालाची घोषणा ः ९ जून

आर्किटेक्‍चरसाठी जूनमध्ये नोंदणी, परीक्षेचे आयोजन जेईई मेन्‍समधील पेपर क्रमांक दोन हा आर्किटेक्‍चर व डिझाईन शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी घेतला जातो. त्‍यानुसार आर्किटेक्‍चर ॲप्टिट्यूड टेस्‍ट (एएटी) २०२४ च्‍या नोंदणीची मुदत ९ व १० जून असेल. परीक्षा १२ जूनला घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल १५ जूनला जाहीर केला जाणार आहे.

JEE Advanced Exam
JEE Advance Exam: जेईई ॲडव्हान्सला विद्यार्थी मुकल्याची व्हावी चौकशी : रविंद्र तळपे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com