BBA-BCA CET Exam : बीबीए, बीसीए सीईटीसाठी 39 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; ऑनलाइन नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदत

BBA-BCA CET Exam : बारावीनंतर व्‍यवस्‍थापन, संगणकशास्‍त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बीबीए, बीसीए प्रवेशासाठी नियोजित सीईटी परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
BBA BCA CET Exam
BBA BCA CET Exam esakal

BBA-BCA CET Exam : बारावीनंतर व्‍यवस्‍थापन, संगणकशास्‍त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बीबीए, बीसीए प्रवेशासाठी नियोजित सीईटी परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राज्‍यस्‍तरावर ३८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली. दरम्‍यान, येत्‍या गुरुवार (ता. १८)पर्यंत सीईटी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. (Nashik Registration of 39 thousand students for BBA and BCA CET )

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जातील. टप्प्‍याटप्प्‍याने विविध शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षा होत आहेत. सीईटी सेलतर्फे या परीक्षांचे आयोजन केले जाते. यंदापासून प्रथमच बीबीए आणि बीसीए यासह बीएमएस, बीबीएम या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले. (latest marathi news)

BBA BCA CET Exam
CET Exam News : ‘नीट’ देणाऱ्यांना ‘सीईटी’ची तारीख बदलण्याची संधी

पदव्‍युत्तर अभ्यासक्रम एमबीए, एमसीएच्‍या धर्तीवर यंदापासून ही सीईटी परीक्षा पदवी स्‍तरावरही घेतली जात आहे. सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून, रविवार (ता. १४)पर्यंत राज्‍यातील ३८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. येत्‍या गुरुवारपर्यंत नोंदणी मुदत असून, नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ४० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मेअखेरीस सीईटी परीक्षा

या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा मेअखेरीस होणार आहे. लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेता, सीईटी सेलने विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्‍यानुसार बीबीए, बीसीए शिक्षणक्रमांची सीईटी परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा घेतली जाईल.

BBA BCA CET Exam
BBA-BCA CET Exam : बीबीए-बीसीए सीईटीच्‍या नोंदणीची 11 एप्रिलपर्यंत मुदत; 4 अभ्यासक्रमांसाठी संयुक्‍त सीईटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com