Nashik News : जिल्हा बॅंक प्रशासक, एमडी यांचा राजीनामा; कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरल्याने नाराज

Nashik : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण व व्यवस्थापक संचालक (एमडी) संजय पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
Resignation
Resignationesakal

Nashik News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण व व्यवस्थापक संचालक (एमडी) संजय पाटील यांनी राजीनामा दिला आहे. सदर राजीनामा दिल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रशासकांस बैठकीत सुनावल्याने ते नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅंकेवर प्रशासकांची नियुक्ती झालेली आहे. ( Resignation of District Bank Administrator MD)

गेल्या वर्षी फेब्रुवारीत शासनाने तत्कालीन प्रशासक अरुण कदम यांना मुदतवाढ न देता त्यांची नियुक्ती रद्द केली होती. त्या वेळी शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे निवृत्त सहव्यवस्थापक प्रतापसिंह चव्हाण यांची नियुक्ती केली होती. प्रशासक चव्हाण गत सव्वा वर्षापासून अडचणीत असलेली बॅंक पूर्वपदावर आणण्यासाठी काम करीत आहेत. यातच बॅंकेचा परवाना अडचणीत सापडला. या कठीण परिस्थितीत ३१ मार्चअखेर समायोजन योजना, वसुली या माध्यमातून बॅंक काहीशी नफ्यात आणली.

यातच, जिल्हा बँकेच्या तात्पुरत्या (कंत्राटी) ३७२ हून अधिक सेवकांना कायम करावे, वेतनवाढ द्यावी, मेडिक्लेम सुविधा लागू करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही रजा व सुविधा लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी ५ एप्रिलपासून संपावर गेले. कर्मचाऱ्यांनी याबाबतची नोटीसही दिली होती. २० दिवस होऊनही यावर तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) बॅंकेत ठिय्या आंदोलन केले.  (latest marathi news)

Resignation
Nashik News : फार्मास्युटिकल मेडिसीन, हेल्थकेअर अॅडमिनीस्ट्रेशन, पब्लिक हेल्थला प्रवेश सुरू; 20 मेपर्यंत मुदत

या वेळी झालेल्या बैठकीत कर्मचारी व प्रशासक यांच्यात चर्चा झाली. परंतु, कर्मचारी मागण्यांवर ठाम होते. प्रशासक चव्हाण बॅंकेची बाजू मांडत कायदेशीर अडचणी असल्याचे सांगत होते. यातच आक्रमक झालेल्या एका कर्मचाऱ्याने प्रशासकांनाच सुनावल्याचे समजते. यात काही कर्मचाऱ्यांनी प्रशासक व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पगारवाढीचा मुद्दाही काढला. कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळाल्याने प्रशासक चव्हाण संतप्त झाले.

बैठक सोडून ते निघून गेले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मी राजीनामा देत असल्याचे सांगितले. याबाबत प्रशासक चव्हाण यांनी शासनाकडे राजीनामा सादर केला आहे. तसेच, वारंवार कर्मचाऱ्यांकडून पगारवाढीचा विषय काढला जात असल्याने नाराज झालेल्या व्यवस्थापकीय संचालक पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. सदर राजीनामा प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

''जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक संचालक पाटील यांचा राजीनामा प्राप्त झालेला आहे. मी माझा राजीनामा शासनाला सादर केला.''- प्रतापसिंह चव्हाण, प्रशासक, जिल्हा बँक

Resignation
Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त; लोकसभा निवडणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com