Nashik Reel Firing Case : रील बनवण्याचा नाद बेतला अंगाशी! नाशिकमध्ये 19 वर्षीय तरुणीकडून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार, पोलिसांकडून कारवाई

Nashik Road 19 year old woman firing case : नाशिक रोड परिसरात सोशल मीडिया रील बनवण्याच्या हव्यासापोटी १९ वर्षीय तरुणीने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला. मोबाईलमधील व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
19 year old woman air firing Nashik Road

19 year old woman air firing Nashik Road

esakal

Updated on

नाशिक रोड : समाजमाध्यमांवर रील तयार करण्याच्या हव्यासापोटी एका १९ वर्षीय तरुणीने बेकायदा गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोड परिसरात उघडकीस आला (Nashik social media reel firing case) आहे. गोळीबाराचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवल्याने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. नाशिक रोड पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेत तिच्यासह कट्टा पुरविणारा संशयित भूषण गोसावी याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com