

Nashik Accident
Esakal
पेठ, ता. १४ : नाशिक-पेठ महामार्गावरील सावळघाटात मंगळवारी (ता. १४) सायंकाळी ट्रकचा ब्रेक 'फेल' झाल्याने झालेल्या भीषण अपघातात मारुती इको कार दोन ट्रकमध्ये चिरडली जाऊन चार जणांचा मृत्यू झाला; तर एकजण जखमी झाला. या दुर्घटनेमुळे घाट परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.