Nashik: रस्त्यांची तोडफोड करणे झाले महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची तोडफोड

नाशिक : रस्त्यांची तोडफोड करणे झाले महाग

नाशिक : विविध कामांसाठी महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांची तोडफोड करताना द्यावयाच्या मोबदल्यात अर्थात रोड रिस्टोरेशन चार्जेसमध्ये वाढ करण्यात आली आहे. रस्ता तोडफोड फी मध्ये वाढ करताना घरगुती कामासाठी रस्ता फोडल्यास फक्त रोड रिस्टोरेशन चार्जेस भरावे लागणार आहे, तर देखरेख खर्च व अठरा टक्के जीएसटी कंपन्यांना अदा करावे लागणार आहे.

महापालिकेकडून शहरात रस्ते तयार केले जातात. परंतु नळ जोडणी, विद्युत तसेच अन्य केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. त्यासाठी महापालिकेकडे रस्ते तोडफोड फी अदा करावी लागते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी दर जाहीर केले जातात. या वर्षी दर जाहीर करण्यात आले असताना नव्याने सुधारित दर जाहीर करण्यात आले. महापालिकेने रोड रिस्टोरेशन चार्जेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

खासगी प्रकल्पांसाठी रस्ता फोडल्यास पंधरा टक्के अतिरिक्त देखरेख खर्च, तसेच तीस वर्षांसाठी जागा भाडे व त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना गटार, पाणीपुरवठा, वीजजोडणी किंवा कमी प्रमाणात रस्ता खोदला गेल्यास त्यासाठी रस्ते फोडण्याची परवानगी न घेता फक्त रोड रिस्टोरेशन चार्जेस घेतले जाणार आहे. सध्या शहरात विविध खासगी मोबाईल कंपन्या, तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून घरगुती गॅस पाइपलाइन खोदण्यासाठी रस्ते फोडले जात आहे. आता या कंपन्यांना अधिक चार्जेस अदा करावे लागतील.

दरवाढीबरोबरच कडक नियमावली

रोड रिस्टोरेशन खर्च अदा केल्यानंतर महाराष्ट्र नॅचरल सारख्या कंपन्यांकडून रस्ता कशाही पद्धतीने खोदला जातो. परंतु, आता मोजमाप वाढल्यास त्याची भरपाई वसूल केली जाणार आहे. करात वाढ झाल्यास त्या फरकाची रक्कम, पुनर्भरण करीत असताना त्यातून निघालेली खडी, मुरूम वापरून रस्ता समतोल करणे, पेव्हर ब्लॉक व्यवस्थित बसविणे बंधनकारक राहणार आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

रस्ते फोडण्याचे सुधारित दर (रनिंग फूट रुपये)

डांबरी रस्ता खोदाई .......................................६,२७२

काँक्रिट रस्ता खोदाई......................................६,८९३

रस्त्याच्या कडेला साइड पट्टीतील

मुरूम, माती मधील खोदाई...............................१६८

खडीचा रस्ता खोदणे......................................२,७४२

पेव्हर ब्लॉक, फुटपाथ खोदाई..............................४,७४३

loading image
go to top