Nashik News : नाशिक रोडला अतिक्रमणाची कारवाई नावापुरतीच!

Encroachment outside Somani Park.
Encroachment outside Somani Park.esakal

नाशिक रोड : नाशिक रोडला सध्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत दुजाभाव केला जात आहे. बुधवारी (ता. १८) केवळ नाशिक रोडला अतिक्रमण विभाग पथक फिरले मात्र कारवाई सोयीच्या ठिकाणी केल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी काही माजी नगरसेवकांच्या टपऱ्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातगाडे उभारले आहेत. (Nashik road encroachment increasing Nashik News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Encroachment outside Somani Park.
Nashik News: हक्क सिद्ध करण्यासाठी वन विभाग अपिलात जाणार का? कारवाईचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

पक्का पत्र्याच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसून भाजी बाजार, पक्की बांधकाम पुढाऱ्‍यांच्या व्यावसायिक टपऱ्यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

अनेक ठिकाणी पत्र्याचे पक्के बांधकाम असूनही हे पाडले जात नाही. नावापुरती कारवाई दाखवण्यासाठी महामार्गावर कलाकुसरीच्या वस्तू, पाटा विकणारे कारागीर यांच्यावर करण्यात येत आहे.

राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असणाऱ्या नाशिक रोड येथील मुक्तिधामच्या आसपास असणाऱ्या टपऱ्या, हातगाडी, वडापाव विक्रेते, शिवाजी पुतळ्याच्या समोरील काही पक्क्या टपऱ्या, चप्पल दुकाने, कपड्याची दुकाने, राजेंद्र कॉलनी येथील अनधिकृत भाजी बाजार, सिन्नर फाटा येथील टपऱ्या, गायकवाड मळा येथील अनधिकृत काही बांधकामे, वास्को चौक जवळील टपऱ्या यांना हात लावायची हिंमत अतिक्रमण विभागाचे अधिकारी करत नाही.

Encroachment outside Somani Park.
Nashik Crime News : ओझर खूनप्रकरणी पोलिसांना यश; शोध पथकाला पंधरा हजाराचे बक्षीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com