Nashik Crime News : ओझर खूनप्रकरणी पोलिसांना यश; शोध पथकाला पंधरा हजाराचे बक्षीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Late Pramod Nikalje

Nashik Crime News : ओझर खूनप्रकरणी पोलिसांना यश; शोध पथकाला पंधरा हजाराचे बक्षीस

ओझर (जि. नाशिक) : गेल्या १२ जानेवारीला ओझर पोलिस ठाणे हद्दीत आंबेडकरनगर, ओझर परिसरात मृत प्रमोद निकाळजे (वय ३२, रा. ओझर, ता. निफाड) यास अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने त्याचे शरीरावर वार करून गंभीर दुखापत करून खून केला होता. ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (Police success in Ozar murder case Fifteen thousand reward to search team Nashik Crime News)

हेही वाचा: Ahmednagar Crime: गावठी पिस्तुलासह एकास अटक

या खुनाच्या तपासात जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, ओझरचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला.

गुप्त बातमीप्रमाणे त्या दिवशी मृताचे दोन व्यक्तींबरोबर वाद झाला होता. त्यानुसार पथकाने ओझर गावातून जयेश देवराम भंडारे, संदीप मधुकर बनसोडे (दोन्ही रा. आंबेडकरनगर, ओझर) यांना ताब्यात घेतले.

त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी १२ जानेवारीला मध्यरात्री प्रमोदला तलवारीने, चॉपरने डोक्यावर, तोंडावर हातांवर वार करून ठार मारले असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik Crime News : कहांडळ वाडीत लष्करात असलेल्या भावंडांकडे भर दुपारी घरफोडी

मृत प्रमोद निकाळजे व संशयित जयेश भंडारे या दोघांचे ओझर येथील एकाच महिलेशी प्रेमसंबंध होते, यावरून दोघांमध्ये वाद होऊन भंडारे व त्याचा मित्र संदीप बनसोडे यांनी प्रमोदचा तलवार व चॉपरने वार करून खून केला. यातील दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास ओझर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंगलवार करीत आहे.

खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, ओझर पोलीस निरीक्षक अलोक हाटे, अर्चना तोडमल, किशोर आहेरराव, विश्वनाथ पावले, दिपक गुंजाळ, अनुपम जाधव, बंडू हेगडे, जितेंद्र बागुल, रमेश चव्हाण,

झामरू सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी तसेच स्वागताचे रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ वाघमोडे, रविंद्र टलें, सागर काकड यांचे पथकाने ही कारवाई केली. वरील खुनाचे गुन्ह्यात उत्कृष्टरीत्या तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास पंधरा हजारांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यातील उच्चभ्रु परिसरात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी केली 'ही' कारवाई!