
Summary
1️⃣ नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन युवक खाली पडले.
2️⃣ या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
3️⃣ घटना शनिवारी रात्री सुमारे पाऊणे नऊच्या सुमारास घडली.
नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून तीन तरुण खाली पडल्याची दुर्घटना शनिवारी रात्री घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोल (बिहार) कडे जाणाऱ्या गाडी नंबर 12546 कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडल्याने या तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला.