Nashik City Transport : शरणपूर रोडचा मार्ग एकेरी; वाहतूक मात्र दुहेरी

Nashik News : सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या शरणपूरच्या मॉडेल रोडचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या तालुका पोलिस ठाणे ते राणे डेअरी चौकापर्यंतचे काम सुरू आहे.
Excavation for smart road works on Sharanpur Road.
Excavation for smart road works on Sharanpur Road.esakal
Updated on

Nashik News : सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या शरणपूरच्या मॉडेल रोडचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या तालुका पोलिस ठाणे ते राणे डेअरी चौकापर्यंतचे काम सुरू आहे. यामुळे या रोडवर एकेरी वाहतूक केलेली आहे. परंतु याठिकाणी वाहतूक पोलिस वा ट्रॅफिक वॉर्डन नसल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक होऊन टिळकवाडी सिग्नलवर वाहतूक कोंडी होते आहे. (road work of Saharanpur has been started)

शरणपूर रोडवरील तालुका पोलिस ठाणे ते टिळकवाडी सिग्नल तर, टिळकवाडी सिग्नल ते राणे डेअरी चौकापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने या रोडच्या मध्यभागी बल्ली-पत्र्यांची बॅरेकेटींग लावून काम सुरु केले आहे. टिळकवाडी सिग्नलपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तर, टिळकवाडी सिग्नल ते राणे डेअरी चौकापर्यंत कामासाठी रस्ता फोडण्यात येत आहे.

या कामांमुळे शरणपूर रोडवरील वाहतूक एकेरी केलेली आहे. शहर वाहतूक पोलिस शाखेकडून तशी अधिसूचनाही जारी झालेली आहे. परंतु नियोजनाअभावी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी टिळकवाडी सिग्नलवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते आहे. यातून गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याचीही शक्यता आहे.

तालुका पोलिस ठाण्याकडून टिळकवाडी सिग्नलकडे जाण्यास वाहतुकीला मनाई आहे. तसेच, टिळकवाडी सिग्नलकडून राणे डेअरीकडे वाहतुकीला मनाई आहे. तसे फलक याठिकाणी लावलेले आहेत. परंतु वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करीत एकेरी मार्गावरून वाहने नेत असल्याने एकेरी मार्गावर कोंडी होऊन वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. (latest marathi news)

Excavation for smart road works on Sharanpur Road.
Nashik Crime News : लोकसभा निवडणूक दरम्यान दारु विक्री, वाहतुकीचे 710 गुन्हे

ना वाहतूक पोलिस ना ट्रॅफिक वॉर्डन

शरणपूर रोडच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले परंतु वाहतूक वळविण्यासाठी या ठिकाणी ना वाहतूक पोलिसाची, ना ट्रॅफिक वॉर्डन. त्यामुळे वाहनचालक आपल्या मर्जीप्रमाणे एकेरी मार्गाने आपली वाहने नेतात. प्रत्यक्षात वाहनचालकांनी अधिसूचनेप्रमाणे पर्यायी मार्गांचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईची मागणी होते आहे.

"या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केलेली आहे."
- अंबादास भुसारे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.

Excavation for smart road works on Sharanpur Road.
Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.