Gudhi Padwa Festival : ‘आरटीओ’ ने साधला महसुलाचा मुहूर्त! गुढीपाडव्याला 189 वाहनांची नोंद

Nashik News : प्रादेशिक परिवहन परिवहन विभागाला १ कोटी ६७ लाख ७५ हजार ३५० रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली.
Vehicle Purchase
Vehicle Purchaseesakal

पंचवटी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला अनेक लोक मुहूर्त असल्याने, घर, सोने- चांदी , इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच दुचाकी , चारचाकी वाहन खरेदी करतात. यात गुढीपाडव्याला एकूण १८९ वाहनांची नोंद झाली असून, यात सर्वाधिक १०४ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. यातून प्रादेशिक परिवहन परिवहन विभागाला १ कोटी ६७ लाख ७५ हजार ३५० रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. (Nashik RTO achieved revenue milestone news)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्ताला बाजार पेठेत कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीही भर पडते. वर्षाच्या पहिला सण असलेला गुढीपाडवा तसेच दिवाळी, दसरा, गणेशचतुर्थी या दिवशी अनेक लोक वाहन खरेदीसाठी पसंती देतात. तर गुढीपाडवा, दसरा, लक्ष्मी पूजन या दिवशी वाहन, सोने, घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींना पसंती देतात. गुढीपाडव्याला तीन ते चार दुचाकींची विक्री झाली असली तरी मात्र ‘आरटीओ’मध्ये केवळ ४१ दुचाकींची नोंद झाली आहे.  (latest marathi news)

Vehicle Purchase
Gudhi Padwa : मराठी नववर्षाला उभारली लेकीच्या जन्माची गुढी; नागपुरात गुढीपाडव्याच्या दिवशी जन्मल्या 39 मुली

दुचाकी व चारचाकी बुकिंग गुढीपाडव्याला आपल्या घरी घेऊन जायची यासाठी आठ दहा दिवस दुचाकी चारचाकी शोरूममध्ये नोंद केली जाते आणि सणाच्या दिवशी वाहन घरी घेऊन जातात. प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुढीपाडव्याला रुग्णवाहिका (१), बांधकाम उपकरणे वाहन (१), डंपर (४), मालवाहू वाहन (३३), एम-सायकल/स्कूटर (४१), चारचाकी (१०४), प्रवासी रिक्षा (५) अशा एकूण १८९ वाहनांची नोंद झाली आहे.

Vehicle Purchase
Gudhi Padwa Shobha Yatra: मुंबईत गुढी पाडव्याच्या शोभायात्रा कोणी सुरु केल्या? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com