Nashik Rural Police Recruitment : ग्रामीण पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी 1861 उमेदवार पात्र

Police Recruitment
Police Recruitment esakal

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ पोलिस शिपाई पदांसाठी झालेल्या मैदानी चाचणीतून १:१० या प्रमाणानुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांची शासनातर्फे लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. (Nashik Rural Police Recruitment 1861 Candidates Eligible for Rural Police Recruitment Written Exam nashik news)

या लेखी परीक्षेकडे आता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे लक्ष लागून आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलात १६४ रिक्त पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाईन १८ हजार ९३५ अर्ज आलेले होते. यातून मैदानी चाचणीसाठी १३ हजार ८६ उमेदवार उपस्थित होते.

यात ११ हजार २४४ उमेदवार हे शारीरिक मोजमापे व कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये पात्र ठरले होते. यातील ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ वा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले होते. त्यामुळे या उमेदवारांमधून १:१० या प्रमाणात १ हजार ८६१ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे.

लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी (कटऑफ) www.nashikruralpolice.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांना भरती संदर्भात शंका असल्यास त्यांनी नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष (०२५३-२२००४०१/२२००४९५/२२००४९९) येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Police Recruitment
Nashik News: शिर्डीत Night Landingचा परवाना प्राप्त; फडणवीसांनी PM, ज्योतिरादित्य शिंदेंचे मानले आभार

प्रवर्गानिहायलेखी परीक्षेसाठीचा पात्र कटऑफ

वर्गवारी................ओपन.......एससी......एसटी.....व्हिजे-ए........एनटी-बी......एनटी-सी....एनटी-डी.....एसबीसी.....ओबीसी.....इडब्ल्युएस

सर्वसाधारण............४३.......३४......३४.....३८........३६........३९........४०..........२६.........४०.......३८

महिला..................४०.....२८......३०.......२७.........२८.........२८..........३२......--..........३०......२५

खेळाडू.................२९......--.......---......--..........--.........--...........--......--.........२५..........२८

प्रकल्पग्रस्त...........३६.......२८......२६......--.........---........--.........---.......---.........३०.........२८

भुकंपग्रस्त............२६.......---.......---.....--.......--...----........--........--............---........---

माजी सैनिक..........४३........३३......२६.......--......३६.........३८........--.......--......२८.......३०

अंशकालिन पदवीधर...--...--...---....---....---....----....---.....--......---........---.......---

पोलिस पाल्य....२५....--.......--...--......--......--..........--.....--.........--

गृहरक्षक दल....४२.......२५.......२६........---.....---.....---.....----.......----.....३७......३८

अनाथ .........३०...---......---.....---......---....----......----.....-----.....---......----.....-----

Police Recruitment
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांच्या खर्चाचा विसर; मुदत संपूनही पुढाऱ्यांचा प्रतिसाद नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com