Police Recruitment: उद्यापासून ग्रामीण पोलीस भरतीची प्रक्रिया; उमेदवारांनी या गोष्टी सोबत ठेवा

Police Recruitment
Police Recruitment Sakal

नाशिक : तब्बल तीन वर्षांनी महाराष्ट्र पोलीस दलात भरती होत असल्याने तरुणांचा उत्साह दुणावलेला आहे. येत्या सोमवारपासून (ता. २) प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होत असून, सुरवातीला शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

अर्ज केलेल्या उमेदवारांना महाआयटी सेलकडून तारखेनिहाय प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. त्यानुसार उमेदवारांनी प्रवेशपत्र व कागदपत्रांसह आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Police Recruitment
Nashik Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या 164 जागांवर होणार पोलिसभरती

गेल्या ९ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे १४ हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. त्यासाठी मागविण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती.

परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे १४ हजार जागांसाठी १८ लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, येत्या सोमवारपासून पोलीस भरतीच्या शारीरिक व मैदानी चाचणीला प्रारंभ होत आहे.

Police Recruitment
Nashik News : नवीन वर्षात पोलिस आयुक्त शिंदेंकडून ‘पिंपरी-चिंचवड’ पॅटर्न

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील १७९ जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू होते आहे. यामध्ये पोलिस शिपाईपदाचे १६४ आणि चालक १५ या पदांचा समावेश आहे. यासाठी सुमारे २१ हजार अर्ज दाखल झालेले आहेत.

उमेदवारांना भरतीची ऑनलाईन प्रक्रिया राबविलेल्या महाआयटीकडून उमेदवारांना तारखेनिहाय प्रवेशपत्र रवाना केलेले आहेत. उमेदवारांनी त्या-त्या तारखेनुसार आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारपासून पहाटे सहाला हजर राहावयाचे आहे.

मैदानी चाचणीसाठी दोन मैदान

पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची मैदानी चाचणी दोन मैदानांवर होणार आहे. आडगावच्या ग्रामीण पोलीसांचे मैदानावर उमेदवारांच्या शारीरिक व मैदानी चाचणी होतील. त्याचप्रमाणे, पोलीस अधीक्षक कार्यालयानजिकच असलेल्या भुजबळ नॉलेज सिटीच्या (मेट) मैदानावरही उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. याठिकाणी प्रशस्त धावण्याचा ट्रॅकही आहे.

Police Recruitment
Nashik News : गतवर्षात नाशिककरांनी अनुभवला 3 पोलिस आयुक्तांचा कारभार

ही कागदपत्रे आवश्‍यक

* उमेदवारांच्या ओळखपत्रांच्या (ॲडमीट कार्ड) दोन प्रती

* आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती

* सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींचा संच

* आवेदन अर्जासोबत जोडलेले पासपोर्ट साईजचे ६ फोटो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com