SAKAL Impact : अखेर फुटलेल्या ड्रेनेजलाइनची दुरुस्ती

SAKAL Impact : श्रमिकनगरमधील माळी कॉलनीमधून वाहत जाणारा पावसाळी नैसर्गिक नाल्यामधून जाणारी सांडपाण्याची ड्रेनेजलाइन फुटल्यामुळे सदर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नैसर्गिक नाल्यात मिसळत आहे.
Drainage line repaired.
Drainage line repaired.esakal

SAKAL Impact : श्रमिकनगरमधील माळी कॉलनीमधून वाहत जाणारा पावसाळी नैसर्गिक नाल्यामधून जाणारी सांडपाण्याची ड्रेनेजलाइन फुटल्यामुळे सदर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नैसर्गिक नाल्यात मिसळत आहे. उघड्यावर वाहणाऱ्या या दूषित पाण्याचा परिसरात दुर्गंध प्रसार होत होता. याबाबत ‘सकाळ’ वृत्त प्रसिद्ध होताच ड्रेनेजलाइनची दुरुस्ती करण्यात आली. (nashik SAKAL Impact Finally repair of burst drainage line in shramik nagar marathi news )

सदर नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य सुद्धा झाले आहे. ही पाइपलाइन आठ दिवसापासून फुटलेली असूनही महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष करत होते. सदर समस्याबाबत माजी नगरसेवकांसह मनपा अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार केली होती. परंतु समस्या जैसे थे होती.

Drainage line repaired.
SAKAL Impact : वैतरणा धरणाच्या कालव्याचे भगदाड बुजविण्याचे काम सुरू

मनपाच्या ड्रेनेज व आरोग्य विभागाने ड्रेनेजलाइन दुरुस्त करून सांडपाण्याची नियोजन करावे, असे वृत्त ‘सकाळ’ मध्ये शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. वृत्ताची दखल घेऊन ड्रेनेज विभागाने ड्रेनेजलाइन दुरुस्तीचे काम केले. समस्या निराकरण झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

'‘सकाळ’मधील बातमीची दखल ड्रेनेजलाइनचे काम केल्याबद्दल आभार मानतो. अधिकाऱ्यांनी परिसरातील इतर समस्यांचे निवारण करावे.''- कल्पेश कांडेकर, उपमहानगरप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

Drainage line repaired.
Sakal Impact : वनरक्षक बदली प्रकरणात अधिकाऱ्याला अभय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com