SAKAL Impact : दहावा मैल जंक्शनच्या डागडुजीला अखेर प्रारंभ; कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी

SAKAL Impact : मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझरजवळ दहावा मैल जंक्शन मृत्यूचा सापळा बनू पाहत असताना यात त्या सेक्शनच्या टोल वसूल करणाऱ्याने मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले होते.
Workers fill potholes on the highway at Mile 10.
Workers fill potholes on the highway at Mile 10.esakal
Updated on

SAKAL Impact : मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझरजवळ दहावा मैल जंक्शन मृत्यूचा सापळा बनू पाहत असताना यात त्या सेक्शनच्या टोल वसूल करणाऱ्याने मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, प्राधिकरण अधिकाऱ्यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत अखेर त्या पट्ट्याला सुधारण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दहावा मैल येथे दोन्ही बाजूकडील रस्ता खड्डेयुक्त झाल्याने याचा मोठा त्रास वाहनधारकांना करावा लागत आहे. (renovation of 10th mile junction has finally started )

अशातच विमानतळ, जानोरी, मोहाडी, सय्यद पिंप्री, जऊळके दिंडोरी व स्थानिक उपनगरात राहणाऱ्या वाहनचालक आणि रहिवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतो. याच ठिकाणी दररोज अनेक नागरिक महामार्ग ओलांडत असताना तेथील खड्डे आणि स्पिडब्रेकर देखील एक झाल्याने गाडीच्या वेगाचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. दहावा मैल येथून ओझरकडे सुरू होणाऱ्या सर्व्हिस रोडची स्थिती देखील गंभीर अपघातांना आमंत्रण देणारी असताना येथे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. (latest marathi news)

Workers fill potholes on the highway at Mile 10.
SAKAL Impact News : वडाळा घरकुलात साफसफाई मोहीम! सर्वत्र औषध फवारणी; नागरिकांनी मानले ‘सकाळ’ चे आभार

प्रत्येक पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी करणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले होते. परंतु, सकाळने यावर प्रकाशझोत टाकल्यावर सबंधित ठेकेदाराने एकएक टप्पा हाती घेत खड्डे बुजवण्यास प्रारंभ केला आहे. एकीकडे टोल वसुली जोमात असताना रस्ता मात्र कोमात गेला आहे.

उड्डाणपूल कधी होणार?

येथील घोषित झालेला उड्डाणपूल अद्याप कागदावरच असल्याने त्याचे काम नेमके कधी सुरू होईल, हे माहित नाही. पण, रस्ता कायमचा खड्डेमुक्त पाहिजे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

Workers fill potholes on the highway at Mile 10.
SAKAL Impact : सरकारी पाट्या लावणाऱ्या वाहनचालकांना दणका! शहर पोलिसांकडून धडक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com