SAKAL IMPACT News : कोंडी होणाऱ्या चौकांत धडक कारवाई! वाहतूक शाखेकडून सिटीलिंक बसचालकांनाही इशारा

Nashik News : शहरातील चौकांमध्ये अनधिकृतपणे थांबणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
SAKAL IMPACT
SAKAL IMPACTesakal

नाशिक : शहरातील चौकांमध्ये अनधिकृतपणे थांबणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच बसस्थानक सोडून रस्त्यामध्येच उभ्या राहणाऱ्या महापालिकेच्या सिटीलिंक बसचालकांनाही वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ई-चलन मशिनद्वारेच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या अंमलदारच्या विशेष बैठक घेऊन उपायुक्तांनी दिले आहेत. (nashik SAKAL IMPACT Strike action in traffic jams marathi news)

‘सकाळ’मधून ‘अनधिकृत वाहनांमुळे चौकांचा कोंडतोय श्वास’, ‘ई-चलनऐवजी मोबाईलमध्ये बेशिस्तांचे फोटो’ या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांनी गांभीर्याने दखल घेतली. शहर वाहतूक शाखेच्या चारही विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये तातडीने शहरातील चौकांच्या ठिकाणी थांबा नसताना अनधिकृतरीत्या थांबणाऱ्या रिक्षांसह वाहनांवर धडक कारवाईचे आदेश देण्यात आले. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या मदतीने कारवाई करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

आदेशाची अंमलबजावणी

वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांनी दिलेल्या आदेशानुसार, चारही विभागांतील चौकांमध्ये शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने केलेल्या अचानक कारवाईमुळे अनधिकृतरीत्या थांबलेल्या रिक्षाचालकांची पळापळ झाली.  (latest marathi news)

SAKAL IMPACT
Financial Literacy : सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असलेल्या महिला आर्थिक बाबतीत मागे.. अर्थसाक्षरता वाढीसाठी काय करायचं?

रविवार कारंजा, शालिमार चौक, सीबीएस चौकात वाहतूक विभाग दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी कारवाई केल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला. बैठकीतील सूचनेनुसार चौकांमध्ये वाहतूक पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दंड ई-चलन मशिननेच

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून ई-चलन मशिनद्वारे फोटो न काढता मोबाईलवर काढला जात असल्याचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत अंमलदारांना ई-चलन मशिनद्वारेच फोटो काढून दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

"चौकांमध्ये बेशिस्तपणे थांबणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बेशिस्तांवर कारवाईसाठी ई-चलन मशिनचाच वापर करण्याच्याही सूचना केल्या आहेत. अन्यथा संबंधित अंमलदारावर कारवाई केली जाईल."

- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

SAKAL IMPACT
Maha DBT Scholarship Aadhar Link : आधार संलग्नीकरणासाठी मार्च अखेरची मुदत! अन्‍यथा शिष्यवृत्तीपासून वंचित राहाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com