Sakal Special : चालता- बोलता! बॅलन्सशीट आमच्याकडे!

Sakal Special : लोकांकडून पैसा काढण्याची कला फार कमी जणांना अवगत असते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून सर्वसामान्य जरा जपूनच राहतात.
balance sheet
balance sheetesakal
Updated on

बॅलन्सशीट आमच्याकडे!

लोकांकडून पैसा काढण्याची कला फार कमी जणांना अवगत असते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून सर्वसामान्य जरा जपूनच राहतात. पण गाठ पडलीच, तर सुटका कशी करणार, असाही प्रश्‍न आहेच. अशाच एका शासकीय कार्यक्रमात शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी एकत्र जमतात.

धरणसाठा वाढवायचा म्हणजे गाळ तर काढलाच पाहिजे म्हणून सर्वजण एकत्रितपणे पैसे गोळा करायला लागतात. आता आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे कुणी अकरा लाख, पाच लाख, दोन लाख रुपये देतात. पण पैशांची घोषणा झाली, की लगेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित व्यक्तीचा सत्कार व्हायचा. असे करत करत दहा ते बारा व्यक्तींचा सत्कार पार पडला.

आता शेवटचा बुके शिल्लक राहिला आहे, ज्याला कुणाला घ्यायचा असेल, त्याने घोषणा करण्याचे आवाहन सूत्रसंचालक करतो. पण कुणीच उठत नाही म्हटल्यावर पठ्ठ्याने भारी आयडिया लढवली. आमच्यासोबत सीए आणि टॅक्स असोसिएशन असल्यामुळे त्यांच्याकडे तुमचे बॅलन्सशिट आहे. तेव्हा स्वत: पुढाकार घ्या, नाही तर आम्ही त्यांनाच पैसे द्यायला सांगू, असे म्हटल्यावर लोकांनी लाइन लावली नसेल तरच नवल...

(nashik Sakal Special chalta bolta Balance sheet with us marathi news )

थेट खासदाराचा फोन...

लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असताना अजूनही नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने मतदारांचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. बुधवारी (ता. १७) सायंकाळपासून शहरातील अनेक मतदारांचा मोबाईल खणखणू लागला आहे.

फोन उचलताच, ‘मी खासदार हेमंत आप्पा गोडसे बोलतोय...’ असा आवाज येतो. साहजिकच फोन उचलणाऱ्यास असे वाटते, की स्वत: खासदार गोडसेच बोलताय. म्हणून तोही ‘हॅलो हॅलो’ म्हणतो. पण नंतर फोन घेणाऱ्याला समजते, की ते रेकॉर्डिंग आहे.

एकाच मतदारांना वेगवेगळ्या नंबरवरून असे फोन सुरू झाल्याने तो पुरता वैतागला आहे. जेव्हा बोलायचे होते, तेव्हा नाही कधी आला असा फोन, असे म्हणत अनेक जण रेकॉर्डिंग सुरू होताच फोन कट करीत आहेत.  (latest marathi news)

balance sheet
SAKAL Special : चालता- बोलता! हंड्रेड

जिथे गरज, तिथे खर्च करणारच...

‘आपला नेता फार मोठा, खर्चाला नाही तोटा’, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय नेते निवडणुकांमध्ये वारेमाप खर्च करतात. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांतून खर्च केला जातो. पण एरवी अनावश्यक खर्चावर त्यांचे बारीक लक्ष असते.

तर त्याचे झाले, असे की जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी बाळासाहेब थोरात यांचा ‘काटकसरी’ म्हणून उल्लेख करत, ते स्वागतासाठी बुकेचा अनावश्यक खर्च करू देत नसल्याचे सांगितले.

त्यावर उत्तर देताना थोरात यांनी मी काही काटकसरी नाही. जेथे खर्च करायचा जेथे गरज आहे, तेथे मी खर्च करणारच. परंतु, जेथे आवश्यकता नाही तेथे करत नसतो, असे सांगितले. त्या वेळी बैठकीत एकच हशा पिकला.

balance sheet
SAKAL Special : चालता...बोलता ! आमचं ठरलं.. लढणारचं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com