SAKAL Special : चालता- बोलता! पार जीव घेऊन तिकीट दिले...

SAKAL Special : लोकसभा निवडणुकीत यंदा कधी नव्हे, ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद रंगला होता.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal

पार जीव घेऊन तिकीट दिले...

लोकसभा निवडणुकीत यंदा कधी नव्हे, ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद रंगला होता. महायुतीत ही जागा नेमकी कोणाला जाते, यावरून सुरवातीस वादंग झाले. उमेदवारीवरून झालेला हा तिढा अगदी दिल्ली दरबारीही पोहोचला. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही.

अखेर अर्ज दाखल करण्यास तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यावर उमेदवारीबाबत हालचाली होऊन उमेदवाराची घोषणा झाली. त्यानंतर नाशिक व दिंडोरी या दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.

या वेळी जमा झालेल्या गर्दीवरून कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. यात सहभागी ज्येष्ठ कार्यकर्त्याने पार जीव घेऊन तिकीट दिले राव... उमेदवाराला गर्दी जमवायला अगदी कमी वेळ मिळाला. त्यांचा काय दोष असे सांगत बाजू सावरत होता.

(Nashik Sakal Special chalta bolta controversy over candidate of Nashik Lok Sabha constituency)

Lok Sabha Constituency
SAKAL Special : चालता-बोलता! तुला तिथं येऊन मारीन!

पेटवा मशाली

शिवसेनेचे दोन गट झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर येण्याची संधी सोडत नाही. महायुतीच्या रॅली शिवसेना भवन समोरून जात असताना मशाल चिन्ह असलेल्या शिवसेनेच्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून गद्दार अशा घोषणा दिल्या.

महायुतीची रॅली शिवसेना भवन समोर येण्यापूर्वी यातील एकाने आधी माझी मशाल पेटवून येतो त्यानंतर जोरदार घोषणा देता येतील असे सांगत तेथून सटकला. पुढे सिगारेट ओढताना काहींनी बघितल्यानंतर संबंधितांच्या मशालीचा अर्थ त्यांना समजला. (Latest Marathi News)

Lok Sabha Constituency
SAKAL Special : चालता-बोलता; ...अन्‌ वळविली गाडी!

अन डुप्लिकेट पीएमने काढता पाय घेतला

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीकडून जाहीर झालेल्या उमेदवारांनी गुरुवारी (ता. २) अर्ज दाखल केले. या वेळी महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सेम टू सेम’ डुप्लिकेटही प्रचाराच्या रथावर स्वार होता. अर्थात, त्याला पाहून अनेक जण चर्चाही करीत होते.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून उमेदवार आत गेले. त्यानंतर हा डुप्लिकेट पीएम बाहेर फुटपाथवर असताना काही कार्यकर्त्यांनी त्याच्याबरोबर फोटोसेशन केले. त्या डुप्लिकेट पीएमला स्वत:च मोदी असल्याचे ‘फिलिंग’ होत असावे. त्या वेळी काही कार्यकर्ते एकमेकांना बोलावून त्याच्यासोबत सेल्फी घेत होते.

अशाच एकाने दुसऱ्याला सेल्फी काढण्यासाठी बोलावले, तेव्हा दुसरा त्या डुप्लिकेटच्या समोरच म्हणाला, ‘अरे हट, खरे पीएम आले तरी आपण त्याच्यासोबत फोटो नाय काढणार. आयला यांच्यापायी सगळी पंचाईत झाली आहे.’ हे ऐकून डुप्लिकेट पीएमने तेथून काढता पाय घेतला.

Lok Sabha Constituency
SAKAL Special : चालता-बोलता! संकटमोचन आले अन् आश्वासन देऊन गेले

मतविभागणीच्या शोधात

ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकापर्यंतच्या टप्प्यात मतविभागणी हा महत्त्वाचा घटक असतो. प्रतिस्पर्ध्यांकडून एकमेकांचे मतदान कमी करण्यासाठी त्याच जातसमुहाचे किंवा एकाच विचारधारेच्या लोकांचा शोध घेऊन उभे केले जाते. नाशिक लोकसभा मतदारसंघात देखील मतांचा टक्का कमी करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे.

दोन्ही प्रतिस्पर्धी महत्त्वाचे उमेदवार एकाच जातीचे आहेत. त्याव्यतिरिक्त स्वतःकडे मतदान ओढणारे देखील त्याचं जातीचे आहेत. त्यामुळे आता त्याच जातीचे अधिक उमेदवार उभे करण्याऐवजी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा शोध सुरु आहे, जेणेकरून चुकीची मते पडून मतांची संख्या कमी होईल.

Lok Sabha Constituency
SAKAL Special : चालता- बोलता..! तुमचे मौनव्रत सुटले का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com