Sanjay Raut Nashik Daura : पराभव दिसला की, मोदींना हिंदू-मुस्लिम आठवतो : संजय राऊत

Nashik : उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ जुने नाशिक चौक मंडई येथे प्रचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना राऊत यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal

Nashik News : महागाई, बेरोजगारी, विकास आणि मणिपूरमध्ये महिलांवर होणारा अत्याचार यावर कोणी बोलत नाही. निवडणुकीत पराभव होताना दिसला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू-मुस्लिम मुद्दा आठवतो. दुसरे त्यांना काही सुचत नाही. धार्मिक मुद्द्यावर मतदारांशी खेळ खेळायचा आणि निवडणुकीला सामोरे जायचे. (Sanjay Raut criticize Narendra Modi Amit Shah and Raj Thackeray)

असे त्यांच्याकडून केले जात आहे. म्हणून परिवर्तन होणे आवश्यक आहे, असा निशाणा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ जुने नाशिक चौक मंडई येथे प्रचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना राऊत यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या दहा वर्षांत मोदी आणि भाजपकडून केवळ खोटी आश्वासने मिळाली. अशाप्रकारे खोटा बोलणारा पंतप्रधान देशात जन्माला आलेला नाही. देशाचा सन्मान संपवण्याचा प्रयत्न मोदी आणि शहा जोडीने केला आहे. सर्वांना कळून चुकले आहे. आजची सभा त्याचेच उदाहरण आहे. सभा गॅरंटी देत आहे मोदींची गॅरंटी नाही ते जात आहे.

समोरच सलून दिसत आहे. याच सलूनमध्ये मोदी दाढी कापायला येतील, असा टोला लावला. पुढे त्यांनी सांगितले की मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची मंगळसूत्र रोज धोक्यात आली आहेत. मोदी यांनी नोटबंदी केली, दोन वर्ष लॉकडाऊन केले या दोन्ही काळात महिलांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून घर चालविले. आजही मुलांच्या शिक्षण, आरोग्यासाठी अनेक महिला मंगळसूत्र गहाण ठेवत आहेत. (latest marathi news)

मणिपूर आणि काश्मीर याठिकाणी अनेक जवान शहीद झाले. वीर पत्नींना त्यांचे मंगळसूत्राचा त्याग करावा लागतो आहे, हे मोदींना दिसत नाही. मोदींना शिव्या देणारा नेता आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. मुस्लिम लोक मशीदमधून विशिष्ट उमेदवारास मत देण्याचा फतवा काढत आहे.

असे त्याच्याकडून सांगितले जात आहे. फतवा नाहीतर देश संकटात आहे. संविधान संकटात आहे. त्यास वाचवण्यासाठी, तानाशाही संपवण्यासाठी विविध धर्म एकत्र येत आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार राऊत यांनी घेतला. देश वाचवायचा असेल तर देशाच्या गद्दाराला हटविले पाहिजे आणि ते फक्त मतदारच करू शकतात, असे म्हणत त्यांनी समारोप केला.

Sanjay Raut
Nashik News : नाशिक ते माळेगाव एमआयडीसी दरम्यान बस सेवा सुरु

भर पावसात सभा होऊनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोक्यावर खुर्च्या घेऊन सर्वजण सभेत ठाण मांडून बसले होते. यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी नगरसेवक मुशीर सय्यद, सचिन मराठे, काँग्रसचे ज्ञानेश्वर वाघ, संजय चव्हाण, सुचेता बच्छाव, सुरेश मारू, सचिन बांडे, जयंत दिंडे आदी उपस्थित होते.

भर पावसात धगधगली मशाल

संजय राऊत यांची सभा सुरू असताना जोरदार पाऊस सुरू झाला. अशा पावसात नागरिकांनी प्रतिसाद देत सभेत ठिय्या मांडून होते. इतकेच नाही तर शिवसेना ठाकरे गटाची निशाणी मशाल भर पावसात धगधगत होती. जणू निसर्गानेही मशालच्या बाजूने कौल दिला आहे, अशी चर्चा परिसरात सुरू होती.

Sanjay Raut
Nashik News : गुन्हेगारी, अवैध शस्त्रांना आळा घालण्याचे आव्हान! मालेगाव शहरातील घटनांनी शांततेचा भंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com