
नाशिक रोड : नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील पांगारकर कुटुंबाने सायन्स इनोव्हेशन कॅलेंडर तयार केले आहे. या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभराच्या ३६५ दिवसांत शास्त्रज्ञांनी कोणत्या दिवशी कोणत्या गोष्टीचा शोध लावला, हे या कॅलेंडरवर दिले आहे. शिवाय तारखेवर असणारे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर हिंदी-मराठी भाषेतून सबंध शोधाची माहिती उपलब्ध होते.