Nashik News : ‘जलयुक्त शिवार’मध्ये नाशिक राज्यात दुसरे; अडीच हजार कोटींचा आराखडा

Nashik : भारतीय जनता पक्ष सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
jalyukta shivar
jalyukta shivaresakal

Nashik News : भारतीय जनता पक्ष सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यवतमाळच्या २९७ गावांमध्ये २३ कोटी रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये १९ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाले असून, तिसऱ्या क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात २४३ गावांत १७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कामे पूर्ण केलेल्या ठेकेदारांना मृद व जलसंधारण विभागाने शंभर टक्के देयके अदा केली आहेत. (Nashik Second in Nashik State in jalyukta shivar marathi News)

जलयुक्त शिवार योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर भाजपने जानेवारी २०२३ मध्ये दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. राज्यात निवडलेल्या पाच हजार ६७१ गावांमध्ये ‘जलयुक्त’च्या कामांसाठी अडीच हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. जलसाठा वाढवण्यासाठी लघुपाटबंधारे, कृषी व वन विभागाच्या माध्यमातून कामे करण्यात आली.

कामांची गती व उपलब्ध निधीच्या आधारे सरकारने ४३६ कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी वर्षभरात ३०६ कोटी रुपये खर्च झाले असून, यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २३ कोटी, तर नाशिक जिल्ह्यात १९ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाले आहेत.

जलयुक्त शिवारची कामे

भूजल पातळी वाढावी म्हणून बंधाऱ्यांचे बांधकाम आणि खोलीकरण केले जाते. या कामांमधून वरच्या स्तरावरील भूजल वाढविण्यास मदत होते. पाण्याच्या स्रोतांचे खोलीकरण आणि रुंदीकरण, मातीच्या आणि सिमेंटच्या बंधाऱ्यांचे बांधकाम, नाल्यांच्या दुरुस्त्या आणि शेततळ्यांची निर्मिती ही प्रमुख कामे या योजनेतून करण्यात येतात.(latest marathi news)

jalyukta shivar
Nashik News : महामार्गावर कोसळला खांब! मनमाड शहरातील घटना

विभागनिहाय झालेला खर्च (कोटी)

जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभाग- आठ

मृद व जलसंधारण विभाग- पाच कोटी ८० लाख

उपवनसंरक्षक पूर्व विभाग- दोन कोटी ७१ लाख

उपवनसंरक्षक पश्‍चिम विभाग- दोन कोटी २० लाख

कृषी विभाग- एक कोटी

jalyukta shivar
Nashik News : दिव्यांग योगेश एका हाताने तयार करतोय कांदा चाळ

जिल्हानिहाय गावे व झालेला खर्च (कोटी रुपये)

यवतमाळ......२९७.......२३ कोटी नऊ लाख

नाशिक.........२३१........१९ कोटी ८८ लाख

नागपूर........२४३........१७ कोटी

अमरावती.....२८८......१५ कोटी ३१ लाख

नांदेड..........२२९........१४ कोटी ६९ लाख

वर्धा.........१७८...........११ कोटी ९९ लाख

''जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची कामे झाली आहेत. कामे पूर्ण केलेल्या ठेकेदारांना मार्चअखेर संपूर्ण देयके अदा केली आहेत. निधी खर्चात नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.''- हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक

jalyukta shivar
Nashik News : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे यात्रीनिवास धुळखात; बांधकामावर कोट्यवधी खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com