Nashik MD Drugs Case : सामनगाव रोड परिसरात 7 महिन्यांपासून ‘एमडी’ची विक्री! पसार दोघा संशयितांच्या मागावर पोलिसांची पथके

Crime News : संशयित किरण चव्हाण हा गेल्या सात महिन्यांपासून याच परिसरामध्ये एमडी विक्री करीत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे
MD Drugs Crime
MD Drugs Crimeesakal

Nashik MD Drugs Case : सामनगाव रोड परिसरामध्ये एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करताना अटक करण्यात आलेला संशयित किरण चव्हाण हा गेल्या सात महिन्यांपासून याच परिसरामध्ये एमडी विक्री करीत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. (Nashik MD Drugs Case) तर एमडी ड्रग्ज किरणला विक्री करणारे दोघा संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून, पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Nashik Selling MD in Samangaon Road area for 7 months marathi news)

किरण चंदू चव्हाण (२३, रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) यास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सामनगाव रोडवर डिजीटल काट्यासह सुमारे ५८ हजार रुपयांच्या एमडी ड्रग्जसह पकडले होते. या परिसरामध्ये गेल्या सात महिन्यांपासून एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. संशयित किरण यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.२२) पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, याच परिसरामध्ये गेल्या सप्टेंबर २०२३ मध्ये शहर पोलिसांनी गणेश शर्मा यास एमडी ड्रग्ज विक्री करताना अटक केली. त्याच्या अटकेतूनच नाशिकरोड परिसरात चालणाऱ्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. सनी पगारे, अर्जून पिवाळ यांची टोळी गुन्हेशाखेने अटक केली. याच टोळीने सोलापूरमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्यासाठीचे दोन कारखाने पोलिसांनी उदध्वस्त केले होते.

या घटनेनंतरही नाशिकरोड, सामनगाव परिसरात एमडी ड्रग्जचे रॅकेट सुरू राहिल्याचे दिसून येत आहे. संशयित किरण चव्हाण हा संशयित राहुल सोनवणे, रोहित नेने यांच्याकडून एमडी ड्रग्ज घेऊन सामनगाव रोड परिसरात विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार सोनवणे व नेने या दोघांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.  (latest marathi news)

MD Drugs Crime
Nashik MD Drugs Case: नाशिकमध्ये रस्त्यावरच वजनकाटा घेऊन ‘एमडी’ची विक्री! एकाला अटक; 58 हजारांची एमडी पावडर जप्त

सामनगाव रोड ‘नशेडी’ अड्डा

सामनगाव रोडवर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (पॉलिटेक्नीक) आहे. या महाविद्यालयामध्ये राज्यभरातून विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतीगृहदेखील आहे. त्याचप्रमाणे, गेल्या काही दिवसांमध्ये या परिसराचा विकास झाला असून, रहिवाशी क्षेत्र वाढले आहे.

रेल्वेचे अधिकारी, कर्मचारीही याच परिसरात राहतात. मात्र, सामनगाव रोडवर दुसऱ्यांदा एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. त्यावरून या परिसरात एमडी ड्रग्जची सर्रास विक्री होते हे निश्चीत होते आहे. तसेच, संशयित किरण चव्हाण हा गेल्या सात महिन्यांपासून सामनगाव रोडवरील ठराविक वेळेला येऊन डिजीटल वजनकाट्यावर एमडी ड्रग्जच्या पुड्या विक्री करतो आहे. २ ग्रॅमसाठी दीड ते दोन हजार रुपये आकारले जात होते. यामुळे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी व परिसरातील अनेकजण एमडी ड्रग्जचे ग्राहक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

MD Drugs Crime
Drugs Case : ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनियाची प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात; हवाला व्यवहाराचा ‘ईडी’ कडून तपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com