नाशिक : लांडगासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात सात जखमी

कारवाडी शहाजापूर गावात उच्छाद
लांडगासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात सात जखमी
लांडगासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात सात जखमीsakal

नाशिक : लांडगासदृश्‍य प्राण्याच्या हल्ल्यात सिन्नर व कोळपेवाडी भागातील सात जण जखमी झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. पहाटे सहापासून तर सकाळी अकरापर्यत लांडग्याने वेगवेगळ्या भागात नागरिकांवर हल्ले केल्याचे पुढे येते आहे. सायंकाळी उशीरापर्यत जिल्हा रुग्णालयात जखमी रुग्ण दाखल करण्याचे काम सुरु होते.

नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील गावांमध्ये आज हिंस्त्र प्राण्याच्या उच्छादात अनेक जण जखमी झाले. सकृतदर्शनी संबधित प्राणी लांडगा असल्याचे प्रत्यक्षदर्शीच म्हणण आहे. दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवरील कारवाडी, शहाजापूर, रामपूर भरतपूर गावात उच्छाद गावा दरम्यान नेहमीप्रमाणे लोकांची ये जा सुरु होती. पहाटे रामपूरला विठाबाई नरोडे या महिलेवर हल्ला झाला. त्यानंतर एका वस्तीवर हल्ला झाला. तशाच प्रकारच्या घटना भरतपूर आणि कोळपेवाडी शिवारातील वेगवेगळ्या भागात झाल्याचे पुढे आले. सिन्नर (जि. नाशिक) कोळपेवाडी (जि. नगर) गावाच्या हद्दीवर आज सकाळी लांडगा सदृश्य जनावराच्या हल्ल्यात दोन्ही गावातील ७ जण जखमी झाले.

पहाटे सहा ते सकाळी अकरापर्यंत वेगवेगळ्या भागात, रस्त्यावर आणि मळे वस्त्यावर हल्ले करून जखमी केल्याचे पुढे येऊ लागल्याने त्यांना सुरुवातीला सिन्नरला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलका चांगदेव म्हस्के (४५), ताराबाई काशिनाथ थोरात (३५), विठाबाई अर्जुन नरोडे (६०), महेश विलास खालकर (२६), रावसाहेब सोमनाथ खरात (३५), वैष्णवी शरद आवारे (१९), गुलाब सलीम शेख ६५) अशी जखमींची नावे आहेत. नाशिकला जिल्हा रुग्णालयात सगळ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आहेत.

दोन्ही तालुक्यात सकाळपासून तर दुपारपर्यत लांडग्याचा उच्छाद सुरु होता. अतिशय गंभीर स्वरुपाचे चावे घेतले आहे. वेगवेगळ्या भागात या घटना घडत असल्याने लवकर लक्षात आले नाही. दुपारनंतर चित्र स्पष्ट होत गेले. वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा.

- भाउसाहेब थोरात

आमच्या वस्तीवर असताना आमच्या भावयजींवर हल्ला केला. आमच्या लक्षात आल्यावर तातडीने आम्ही सोडविले. आधी त्यांना सिन्नरला उपचाराला दाखल केले. त्यानंतर दुपारपर्यत या घटना सुरु होत्या.

- गोकुळ नरोडे,उपतालुकाप्रमुख शिवसेना, सिन्नर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com