ठाकरे बंधू मोर्चा

ठाकरे बंधू मोर्चा
Published on: 
नाशिकमधून हजारो शिवसैनिक जाणार दत्ता गायकवाड : मुंबई महामोर्चा नियोजनासाठी बैठक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी (ता. ४) मुंबईत दोन्ही पक्षांच्या वतीने भव्य संयुक्त महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. शुक्रवारी (ता. २) जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांच्या प्रमुखांची बैठक शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडणूक प्रक्रियेत होत असलेले घोटाळे आणि मतदारांचा होत असलेला अपमान याविरोधात हा मोर्चा असून, ज्ञानेश कुमार यांना तात्काळ पदावरून हटवावे, ही प्रमुख मागणी असणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मुंबईतील या ऐतिहासिक मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यात प्रचंड उत्साह असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करणार आहेत. या नियोजन बैठकीला जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, जिल्हा सचिव नीलेश साळुंके, लोकसभा संघटक ऋषी वर्मा, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्वाती पाटील यांच्यासह महेश बडवे, शैलेश सूर्यवंशी, सुनील जाधव, राहुल दराडे, सचिन बांडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com