Nashik News : कडक उन्हामुळे दुपारी सिग्नल बंद; सायंकाळी सुरू करण्याचा विसर

Nashik : कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी सिग्नलवर वाहनचालकांना थांबावे लागू नये म्हणून शहरातील काही सिग्नल्स दुपारी १२ ते ४, या वेळेत बंद ठेवण्याच्या सूचना होत्या.
Traffic signals that are closed even in the evening
Traffic signals that are closed even in the eveningesakal

Nashik News : कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी सिग्नलवर वाहनचालकांना थांबावे लागू नये म्हणून शहरातील काही सिग्नल्स दुपारी १२ ते ४, या वेळेत बंद ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यानंतर ते सिग्नल अंमलदारांनी नियमित सुरू करणे अपेक्षित असताना, नेमका त्याचाच विसर पडत असल्याने शहरातील काही सिग्नल सायंकाळनंतरही बंदच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ()

गेल्या महिनाभरापासून शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. कधी नव्हे ते शहरातील कमाल तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहाते आहे. सकाळी दहानंतर शहरातील रस्ते सुनसान होतात. उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकही घराबाहेर पडणे टाळतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील बहुतांशी सिग्नल यंत्रणा बंद करून ‘ब्रिकलर्स’ सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार जादा रहदारी असलेले सिग्नल वगळता शहरांतर्गत उपनगरीय सिग्नल दुपारच्या वेळी बंद केले होते. ज्यामुळे वाहनचालकांना भरउन्हात सिग्नलवर थांबावे लागू नये, असा त्यामागील हेतू होता. वाहतूक अंमलदारांकडून दुपारी सिग्नल बंद केले जातात. परंतु दुपारी चारनंतर ते पुन्हा सुरू करण्याची अपेक्षित होते. (latest marathi news)

Traffic signals that are closed even in the evening
Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून नऊ जण बेपत्ता; 5 महिला, युवती आणि 4 पुरुषांचा समावेश

मात्र वाहतूक अंमलदारांकडून असे होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील उपनगरीय सिग्नल सायंकाळपासून रात्रीपर्यंत बंदच असतात. त्यामुळे या सिग्नल्सवर बेशिस्तीने वाहन धावतात. यातून गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बंद असलेले सिग्नल

- जुने पोलिस आयुक्तालय, शरणपूर रोड
- टिळकवाडी सिग्नल, मनपाजवळ, शरणपूर रोड
- सांगली बँक सिग्नल, रेडक्रॉसजवळ

''कडक उन्हामुळे काही सिग्नल दुपारच्या वेळी बंद ठेवण्याच्या सूचना होत्या. सायंकाळी ते पुन्हा नियमित सुरू करणे अपेक्षित आहे.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Traffic signals that are closed even in the evening
Nashik News : रस्त्यास पडलेले भगदाड ठरतेय मृत्यूचा सापळा; 15 दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com