Nashik Simhastha Kumbh : भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिकांचा ताफा सिंहस्थ कुंभमेळा; ३६ ठिकाणी आरोग्य सुविधा, ३, ६०० अतिरिक्त मनुष्यबळ

190 Ambulances to Be Deployed During Parvani : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ३६ ठिकाणी १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात येणार आहेत.
Nashik Simhastha Kumbh

Nashik Simhastha Kumbh

esakal

Updated on: 

नाशिक : आगामी सिंहस्थात भाविकांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. साधुग्राम, वाहनतळ, नदीघाट, होल्डिंग व स्टेजिंग परिसर तसेच प्रमुख मार्ग परिसरात १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारल्या जाणार आहेत.

तसेच पर्वणी काळात १९० रुग्णवाहिका तैनात करताना विस्तारित आरोग्य व्यवस्थेसाठी अतिरिक्त ३, ६०० वैद्यकीय व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंहस्थाच्या आरोग्यविषयक तयारीसाठी महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्रादेशिक संदर्भ रुग्णालय यांच्या २६० कोटींच्या आरोग्य आराखडा तयार केला आहे.

Nashik Simhastha Kumbh
Mumbai News: 'लालबागचा राजा'च्या दरबारात दुर्दैवी घटना! मंडपाजवळ ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

कुंभमेळा प्राधिकरणाने या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तात्पुरती रुग्णालये व दवाखाने, रुग्णवाहिका, अतिरिक्त मनुष्यबळ, आयसीयू क्षमता, औषधे, वैद्यकीय उपकरणे, रोग नियंत्रण आणि डिजिटल आरोग्य निरीक्षण अशा विविध बाबींचा या आराखड्यांत समावेश आहे.

१, ९४५ खाटांची उपचार क्षमता सिंहस्थात विविध आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून रुग्णालयीन उपचार क्षमतेत वाढ करण्यावर भर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या १, ३०५ खाटांमध्ये आणखी ६४० खाटांची भर पडणार आहे. त्यामुळे एक हजार ९४५ खाटांची उपचार क्षमता उपलब्ध होईल. त्यात १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल.

रुग्णालयांची क्षमताही वाढविणार सिंहस्थातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेत सध्याच्या रुग्णालयांच्या उपचार क्षमतेतही वाढ करण्यात येईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि आरोग्यशाळा रुग्णालय या प्रमुख रुग्णालयांमध्ये ७३ अतिरिक्त आयसीयू खाटा उपलब्ध केल्या जातील. त्यामुळे या रुग्णालयांची एकत्रित आयसीयू क्षमता १७ वरून ९० खाटांपर्यंत, तर एकूण खाटांची क्षमता ३५० वरून ५५० पर्यंत वाढणार आहे.

Nashik Simhastha Kumbh
Maharashtra Drought Notification : दुष्काळाची आजच अधिसूचना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी

आजारांचे डिजिटल निरीक्षण विविध भागांत नोंदविल्या जाणाऱ्या आजारांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करून रोगनिहाय निरीक्षण करण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. यामुळे एखाद्या भागात विशिष्ट आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यास त्याचा वेळेत आढावा घेता येईल. रुग्णवाहिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस आधारित ट्रॅकिंग, आरोग्य केंद्रांमधील डिजिटल नोंदणी व आपत्कालीन संपर्क व्यवस्थेचाही आराखड्यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Ring Road latest update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Kumbh Mela Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com