

Lalbaugcha Raja Pandal Tragedy
ESakal
मुंबई : आठवडाभरापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या 'लालबागच्या राजाच्या' दरबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असताना अचानक बेशुद्ध पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लालबाग परिसरातील ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.