Nashik News : सोसायटी उतारावर, म्हणून कमी दाबाने पाणीपुरवठा; अधिकाऱ्यांचा अजब दावा

Nashik : म्हसरूळ परिसरातील बोरगड रोडवरील ए. के. हाईटस या सोसायटीत गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय अल्प दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.
water reduction
water reductionesakal

Nashik News : म्हसरूळ परिसरातील बोरगड रोडवरील ए. के. हाईटस या सोसायटीत गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय अल्प दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे येथील बोअरचे पाणी बंद झाल्याने रहिवाशांना महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. परंतु जेमतेम अर्धा ते पाऊण तास तेही अल्प दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने हंडाभर पाण्यासाठी वाट पाहावी लागत असल्याचा अनुभव महिलांनी सांगितला. (nashik society is on slopes hence low pressure water supply authorities statement marathi news)

दुसरीकडे याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारले असता ही सोसायटी उतारावर असल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा खुलासा केला जातो. याच न्यायाने जुन्या नाशिकमधील बुधवार पेठ, संभाजी चौक, पाटील गल्ली भागातील तीव्र उतारावरील नळांना पाणीच यायला नको, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

कन्सारा माता चौकातून बोरगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ए. के. हाईटस ही सहकारी सोसायटी असून येथे वीसहून अधिक सदनिकांमधून शंभरहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. मनपाचे घरपट्टी, पाणीपट्टीपासून सर्व कर नियमित भरत असूनही येथे गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय अल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा रहिवाशांचे म्हणणे आहे.

याबाबत मनपा कार्यालयात वारंवार खेटे मारूनही केवळ सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्‍वासन दिले जात असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. एकीकडे शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू असताना केवळ याच ठिकाणी पाण्याअभावी महिला वर्ग त्रस्त आहे.(latest marathi news)

water reduction
Nashik News : पेठ रोडला रस्त्याच्या मधोमध कचराफेक! महापालिकेकडून कारवाई करण्याची गरज

''प्रभातनगर परिसरात नव्याने टाकीचे काम झाले असून, त्यातील काही कामे अपूर्ण आहेत. ते काम पूर्ण झाल्यावर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.''- अरुण पवार, माजी नगरसेवक

''अधिकारी पंधरा दिवसांत सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्‍वासन देतात. टँकर पाठवितो, असे सांगतात. वीस जणांना केवळ अर्धा ते एक तास पाणीपुरवठा तोही अल्प दाबाने केला जातो.''- संगीता पिटेकर, चेअरमन

''आमच्या सोसायटीत गेल्या कित्येक महिन्यांपासून अल्प दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. मनपा विभागीय कार्यालयात जाऊन लेखी तक्रारी केल्या, मात्र धरणात पुरेसा साठा असूनही केवळ आश्‍वासनांवर रहिवाशांचे समाधान केले जात आहे.''- वर्षा पवार, गृहिणी

water reduction
Nashik News : 'माकपा'ला दिंडोरीची जागा 'इंडिया'ने सोडावी : माजी आमदार गावित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com