SSC Exam 2024 : पेपर सोपा गेल्‍याने फुलले चेहरे! दहावीच्‍या परीक्षेला सुरवात

SSC Exam 2024 : करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्‍या दहावीच्‍या लेखी परीक्षेला शुक्रवार (ता. १)पासून सुरवात झाली.
Students busy writing Marathi paper at class 10 examination center on Friday. The student left the examination center with a smiling face on Friday after passing the first paper of class 10 Marathi.
Students busy writing Marathi paper at class 10 examination center on Friday. The student left the examination center with a smiling face on Friday after passing the first paper of class 10 Marathi.esakal

SSC Exam 2024 : करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्‍या दहावीच्‍या लेखी परीक्षेला शुक्रवार (ता. १)पासून सुरवात झाली. प्रथम भाषा विषयांतर्गत मराठीच्‍या परीक्षेला नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्‍येकी एक, असे विभागात एकूण दोन कॉपीबहाद्दर आढळले. दरम्‍यान, पहिलाच पेपर सोपा गेल्‍याने विद्यार्थ्यांचे चेहरे आत्‍मविश्‍वासाने फुलल्‍याचे बघायला मिळाले. (nashik SSC Exam first paper becomes easier marathi news)

शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून दहावीच्‍या लेखी परीक्षेला सुरवात झालेली आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन, या वेळेत प्रथम भाषा विषयाचा पेपर पार पडला. जाहीर केलेल्‍या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी केंद्रावर पोचणे बंधनकारक होते.

परीक्षेच्‍या शेवटी अतिरिक्‍त दहा मिनिटांची सुविधा यंदाही विद्यार्थ्यांना उपलब्‍ध करून दिली होती. निर्धारित वेळेनुसार विद्यार्थी आपल्‍या शालेय गणवेशात केंद्रांवर उपस्‍थित झाले होते. दरम्‍यान, पहिल्‍या दिवशी सुमारे एक लाख ६० हजार विद्यार्थी मराठी भाषेच्‍या परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक तालुक्‍यातील परीक्षा केंद्रावर एक कॉपीबहाद्दर आढळून आला.

तर जळगाव जिल्ह्यात यावल येथे एक कॉपीचा प्रकार आढळल्‍याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. दरम्‍यान, पेपर सोपा गेल्‍याची प्रतिक्रिया बहुतांश विद्यार्थ्यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्‍या चेहऱ्यावरील आत्‍मविश्‍वास वाढला होता. (latest marathi news)

Students busy writing Marathi paper at class 10 examination center on Friday. The student left the examination center with a smiling face on Friday after passing the first paper of class 10 Marathi.
SSC Exam 2024 : दहावीची आजपासून परीक्षा, पहिला पेपर मराठीचा

आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

नाशिकमध्ये सुरू असलेल्‍या आंदोलनामुळे जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील शाळांतील विद्यार्थ्यांची शुक्रवारी गैरसोय झाली. आंदोलकांतून मार्ग शोधत केंद्रांवर पोचताना विद्यार्थ्यांची दमछाक झाली होती. बिटको विद्यालय, आदर्श विद्यालयातील केंद्रांवरील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. दरम्‍यान, या केंद्रांवर अनेक पालक आपल्‍या पाल्‍याच्‍या प्रतीक्षेत थांबताना आंदोलनाच्‍या गराड्यात उभे असल्‍याचे बघायला मिळाले.

दहावीच्‍या परीक्षेतील क्षणचित्रे

- शालेय गणवेशात विद्यार्थी दाखल झाले केंद्रांवर

- बहुतांश विद्यार्थ्यांसोबत त्‍यांच्‍या पालकांची उपस्‍थिती

- अनेक पालकांनी पूर्णवेळ केंद्राबाहेर मांडले ठाण

- केंद्रांबाहेर पोलिस बंदोबस्‍त, कर्मचाऱ्यांची तैनाती

- भरारी पथकांकडून विविध केंद्रांना भेटी

- शेवटच्‍या मिनिटापर्यंत लिखाणात व्‍यस्‍त राहिले विद्यार्थी

Students busy writing Marathi paper at class 10 examination center on Friday. The student left the examination center with a smiling face on Friday after passing the first paper of class 10 Marathi.
SSC HSC Exam 2024 : दहावी- बारावीच्या परिक्षेवरील बहिष्कार मागे !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com