Nashik Stray Dogs News : मातोश्री नगर परिसरात कुत्र्यांचा उच्छाद! महिलेसह चारजण जखमी

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता.
Stray Dogs
Stray Dogsesakal

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून नाशिकच्या मखमलाबाद, हिरावाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. मातोश्री नगर परिसरात एका भटक्या कुत्राने एका महिलेला चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. जखमी महिला खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांत विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. (Nashik stray Dogs attack in Matoshree Nagar area news)

सध्या सुट्टीचे दिवस असल्याने अनेक लहान मुले या परिसरात खेळतात. अशात पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वीही येथील लहान मुलांवर हल्ला केल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेने मखमलाबाद रोडवरील मातोश्री नगर परिसरात घबराट पसरली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

परिसरातील अनेक विभागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. केंद्र सरकारने भटक्या कुत्र्यांना मारण्यास प्रतिबंध केल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड विभागात कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रस्त्यावरून चालणाऱ्‍यांवर भुंकणे, चावणे अशा घटना वारंवार घडत आहेत.

रात्री कामावरून घरी जाणाऱ्‍यांना भटक्या कुत्र्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत असून महापालिकेने कार्यवाही करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दुचाकीवर झेप घेणाऱ्‍या भटक्या कुत्र्यांमुळे मोठे अपघातही परिसरात घडत आहेत. पंचवटीतल्या रामकुंड परिसरातही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे.

तेथे येणाऱ्‍या पर्यटकांना अनेकदा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जागोजागी लावलेल्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, धाबे तसेच लोकांनी बेजबाबदारपणे फेकून दिलेले उरलेले अन्न, कोंबडी-मटणाची दुकाने, मासळी बाजार, कचऱ्‍याचे ढिगारे अशा गोष्टींमुळे सर्वच ठिकाणी भटकी कुत्री सहजतेने पोसली जातात. त्यामुळे दिवसेंदिवस अशा भटक्या कुत्र्यांच्या संख्येबरोबर कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रकारही वाढत आहेत. (latest marathi news)

Stray Dogs
Akola Crime News : सट्टेबहाद्दरांवर तेल्हारा पोलिसांची कारवाई

अनेक श्‍वान नोंदणीविनाच

गेल्या वर्षी मालेगाव स्टँड परिसरातील चिंचबन परिसरात पाळीव श्वानाने एका मुलाला चावा घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. ज्या श्वानाने चावा घेतला होता त्या प्रजातीचे श्वान पाळण्यास बंदी असल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती. शहरातील पाळीव श्वानांची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील अनेक श्वानप्रेमींनी त्यांच्या पाळीव श्वानांची नोंद केलेली नाही.

मातोश्रीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती जॉगिंग ट्रॅकवरून चालताना कुत्र्याने त्या व्यक्तीच्या अंगावर झडप घालत चावा घेतल्याची घटना घडली. यामुळे ती व्यक्ती जखमी असून उपचार सुरू आहेत. या परिसरात उद्यान आहे. या उद्यानात सायंकाळच्या सुमारास लहान मुले, नागरिक फिरण्यासाठी येतात मात्र परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Stray Dogs
Sambhaji Nagar Crime : जनसंपर्क अधिकारी महिलेने केला ३४ लाखांचा अपहार ; ग्राहकांकडून कागदपत्रे मागवून घ्यायची कर्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com