Nashik Success Story : डोंगरजेच्या तृप्तीची तहसिलपदाला गवसणी! जिद्द, चिकाटीच्या बळावर मिळवले यश

Nashik News : डोंगरेज (ता. बागलाण) येथील तृप्ती संभाजी खैरनार हिने २०२२ मध्ये दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसिलदार पदाच्या परीक्षेत यश मिळवून गावाचे नाव मोठे केले.
Trupti Khairnar
Trupti Khairnaresakal

नरकोळ : डोंगरेज (ता. बागलाण) येथील तृप्ती संभाजी खैरनार हिने २०२२ मध्ये दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसिलदार पदाच्या परीक्षेत यश मिळवून गावाचे नाव मोठे केले. जिद्द, चिकाटी या बळावर तिने हे यश मिळवले आहे. (Nashik Success Story Dongerje trupti become Tehsildar news)

तृप्तीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावी तसेच इंजिनिअर कॉलेज के. के. वाघ कॉलेजमध्ये झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेचे ध्येय मनाशी बाळगून तहसीलदार होण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले.

गेल्यावर्षी तृप्तीने महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा देऊन उपअधीक्षक भूमी अभिलेख यात यश मिळवून सध्या ती संभाजीनगर येथे प्रशिक्षण पूर्ण करीत आहे. आता ती तहसीलदार पदाची परीक्षाही उत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचा कौटुंबिक सत्कार झाला. मुलींच्या शिक्षणाची पालकांनी काळजी घ्यावी.

स्पर्धा परीक्षेत मुलींनी नावलौकिक वाढवावा, असे तिने सांगितले. तृप्तीचे वडील प्रा. डॉ. संभाजी खैरनार हे नामपूर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तर आई गृहिणी आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनम आहिरे, प्रा. खैरनार यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते. (latest marathi news)

Trupti Khairnar
Jalgaon Success Story : चिकन विक्री करणारा झाला तलाठी अन् आरोग्यसेवक

"जिद्द, चिकाटी मनाशी बाळगल्यास यश हमखास मिळते. मला या यशात केरसाणे गावाची उपजिल्हाधिकारी पूनम आहिरे हिचे व सहाय्यक राज्य कर आयुक्त निरंजन कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अभ्यासाचे ध्येय पूर्ण केले म्हणून यश प्राप्त झाले."

- तृप्ती खैरनार, तहसीलदार, डोंगरेज (ता. बागलाण)

दोघींची जिद्द पूर्ण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा देण्यापूर्वी डोंगरेजची तृप्ती व केरसाण्याची पूनम या लहान पणापासून वर्ग मैत्रिणी. या दोघींनी आपली जिद्द अखेर पूर्ण केली. दोघींच्या गावाचे अंतर सात किलोमीटर आहे. आम्ही ठरविले होते आपले डिजिटल फलक झळकले पाहिजे आणि अखेर झळकले.

Trupti Khairnar
Success Story: शेतकऱ्याची मुलगी बनली उपशिक्षणाधिकारी, राज्यसेवा परीक्षेत ओबीसीमधून शुभांगी राज्यात पहिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com