Nashik Talathi Success Story : काबाड कष्ट करणाऱ्यामजुराच्या मुलाची तलाठी पदासाठी गवसणी

Success Story : मन चंगा तो काठोट में गंगा आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असली तर मनुष्य कठिणात कठिण स्वप्न पूर्ण करू शकतो.
Social workers from Siddhivinayak Nagar felicitating Abhijeet Garud for his success
Social workers from Siddhivinayak Nagar felicitating Abhijeet Garud for his successesakal

ओझरता : मन चंगा तो काठोट में गंगा आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असली तर मनुष्य कठिणात कठिण स्वप्न पूर्ण करू शकतो. याच आत्मविश्वासाच्या बळावर ओझर शहरातील मोलमोजूरी करणाऱ्या वडील संजय व मातोश्री रंजना गरुड या दामपत्याचे स्वप्न अभिजीत गरुड याने पुर्ण केले या युवकाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण करून ओझरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. (Nashik son of worker nomination for Talathi post marathi news)

कष्टकऱ्यांच्या संघर्षाचे फलीत उत्कृष्ट उदाहरण कसे असावे याचा उत्तम नमुना म्हणून आपण अभिजीत गरुड यांच्या ईच्छाशक्तीकडे बघू शकतो. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण मित्रपरिवार त्याचबरोबर गावातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच सिद्धिविनायकनगर व शहरातील सर्व रहिवाशांच्या मार्फत अभिजीत गरुड यशाबद्दल सत्कार करण्यात आला.(latest marathi news)

Social workers from Siddhivinayak Nagar felicitating Abhijeet Garud for his success
Nashik Success Story : JEE Advanced परीक्षेत अभिषेक ने देशात पटकावला 166 वा क्रमांक

यावेळी सिद्धिविनायकनगर मधील सामाजिक कार्यकर्ते पिंटू शेठ शिंदे,शुभम भाऊ चव्हाण,योगेश शेठ शिंदे,दर्शन जगझाप,शेखर भाऊ जाधव,दिलीपराव जगताप,श्रीराम चव्हाण,रवी गवळी,भारत भाऊ शेलार,जगदीश सूर्यवंशी,दत्तात्रय मोरे,वामन गवळी आदी उपस्थित होते.

तसेच शिवस्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने जुनेद शेख,सिद्धांत वाडेकर, गणेश शेठ निफाडे,सागर कावळे,राहुल बेंडकुळे,ओम दिगंबर गावंडे व इतर नागरिक यांनी देखील अभिजीत गरुड यांचा सत्कार केला.याप्रसंगी अभिजीतच्या आई-वडिलांनी त्याला आशीर्वाद दिले व सर्वांचे आभार देखील व्यक्त केले.

Social workers from Siddhivinayak Nagar felicitating Abhijeet Garud for his success
Nashik Success Story: 12 मेन्स दिल्या, पण हार नाही मानली; शिरसगावचा प्रसाद बनला दुय्यम निबंधक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com