Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्यात उसाच्या रसाला पसंती; रसवंतीगृहातील गर्दीत मोठी वाढ

Summer Heat : दुपारच्या कडक उन्हातही अनेकांना नोकरी व्यवसायानिमित्त भटकंती करावीच लागते.
sugarcane
sugarcaneesakal

Nashik Summer Heat : दुपारच्या कडक उन्हातही अनेकांना नोकरी व्यवसायानिमित्त भटकंती करावीच लागते. अशावेळी आरोग्यदायी व खिशाला परवडेल व कडक उन्हात तृष्णा शमविणाऱ्या उसाच्या रसाला ग्राहकांची पहिली पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भाग, महामार्गावरील रसवंती गर्दीने फुलून गेल्या आहेत. उन्हाळ्यात इतर थंडपेये पिण्यापेक्षा उसाचा ताजा रस पिणे आरोग्यदायी असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. (Nashik Sugarcane juice is preferred in hot summer in city marathi news)

त्यामुळे उसाच्या रसाच्या मागणीत वाढ झाली आहे. महागडे कोल्ड्रिंक, आइस्क्रीम आरोग्याला अपायकारक असल्याने अवघ्या वीस रूपयांत ग्लासभर रस उपलब्ध होत असल्याने रसवंतिगृहे ‘हाऊसफुल्ल’ होत आहेत. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने अनेकांनी रसवंतिगृहे सुरू करून उपजीविका सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या उच्चाटनानंतर इतर लहान- मोठ्या व्यवसायांबरोबच रसवंतीगृहांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

सद्यःस्थितीत शहर व परिसराचा विचार करता हजारहून अधिक व्यावसायिक या व्यवसायात आहेत. एकाच जागी व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच हातगाडी घेऊन फिरणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. अनेकांचा पिढीजात व्यवसाय असून तीन- चार पिढ्या याच व्यवसायात असल्याने दिसून येते.

लाकडी चरख्याचे महत्त्व अबाधित

पूर्वी बहुतांश ठिकाणी बैल जुंपलेल्या लाकडी चरख्याद्वारे रस काढला जात. हल्ली बहुतांश ठिकाणी यंत्राद्वारेच उसाचा रस काढला जातो. मात्र अजूनही चरख्याद्वारे काढण्यात येणाऱ्या उसाच्या रसाला ग्राहकांची अधिक पसंती आहे. अर्थात वेळेला अधिक महत्त्व आल्याने चरख्याद्वारे काढण्यात येणाऱ्या रसवंतीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उरली आहे. (latest marathi news)

sugarcane
Nashik Summer Heat Rise : सलग तिसऱ्या दिवशी मालेगावचा पारा चाळिशी पार

ग्राहक वाढीसाठी आगळी शक्कल

विजेच्या दरांत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक नसल्यास यंत्र सुरू ठेवणे परवडत नाही. त्यामुळे रसाची जाहिरात करण्यासाठी अनेकांनी आगळी शक्कल लढविली आहे. यात रसवंतीगृहाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला स्पीकरद्वारे घुंघराचा आवाज सतत सुरू असतो. आपसूकच ग्राहकांना येथे रसवंती असल्याची माहिती होते. हे दृश्‍य विविध महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर आढळते.

''आरोग्यदायी व काविळीवर गुणकारी असलेला उसाचा रस क्षणात थकवा दूर करतो. कडक उन्हात उसाचा एक ग्लास रस सलाईनसारखी शरीरात ऊर्जा निर्माण करतो.''- हेमंत जगताप, सुंदर शुगर केन ज्यूस सेंटर

निफाड तालुक्यातून आवक

निफाड तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणावर ऊसाचे पीक घेतले जाते. हा ऊस जिल्ह्यातील खासगी कारखान्यांबरोबच नगर जिल्ह्यातील कारखान्यांना पाठविला जातो. याशिवाय अनेक शेतकरी चांगला दर मिळत असल्याने व्यापाऱ्यांमार्फत ऊसाच्या गुऱ्हाळांना पुरवितात. यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. याशिवाय दिंडोरी तालुक्यातील काही भागातूनही शहरात ऊस येतो.

ऊसाचा रस आरोग्यदायी : डॉ. कुलकर्णी

ऊसाचा रस थंड असून विविध विकारांसाठी औषधी आहे. या रसाने शारीरिक शक्ती वाढून तजेला मिळतो. याशिवाय शरीरातील उष्णताही कमी करतो, अशी माहिती डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी दिली. फक्त या रसात बर्फ किंवा अन्य काहीही न टाकता पिल्यास तो अधिक हितावह असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

sugarcane
Nashik Summer heat : मालेगाव शहरातील तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर! हंगामातील उच्चांकी नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com