Nashik Summer heat : मालेगाव शहरातील तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर! हंगामातील उच्चांकी नोंद

Summer Heat : शहर व परिसरात गेली दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर आल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता.
Slow traffic on the city's busy Satana Road
Slow traffic on the city's busy Satana Roadesakal

मालेगाव : शहर व परिसरात गेली दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर आल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. शहरात सोमवारी (ता. १) मात्र पुन्हा एकदा या हंगामातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले होते. शहरात आज कमाल ४२ अंश सेल्सिअस तर किमान २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (Nashik Summer heat Temperature in Malegaon city 42 degrees Celsius season high marathi news)

मागील काही दिवसापासून मालेगावच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सूर्याने आग ओकण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत असून उकाड्याने नागरिक हैरान झाले आहे. आता पुन्हा तापमानात वाढ होत असून येथील तापमान हे राज्यात सर्वाधिक ठरत आहे.

यापूर्वी २७ मार्चला सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वाढत्या उन्हामुळे शहरात दुपारनंतर रस्त्यांवर वर्दळ मंदावत आहे. तसेच उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून कुल्फी, लिंबू सरबत, शिकंजी, आईस्क्रीम, बर्फगोळे, रसवंतीगृहांवर मोठी गर्दी होवू लागली आहे. कडाक्याच्या उन्हापासून संरक्षणासाठी उपरणे, टोपी, गॉगल आदींची विक्री वाढलेली होती. महामार्ग व राज्य रस्त्यांवर टोपी, उपरणे, रुमाल, गॉगल विक्रीची दुकाने जागोजागी आढळून आली.

पुर्व भागात रमजान पर्व सुरु असल्याने दुपारी जणू काही शुकशुकाटच होता. बहुसंख्य मुस्लीम बांधव प्रार्थनास्थळांमध्ये विसावा घेताना आढळून आले. शहरातील प्रमुख मशिदीत मोठे पंखे, वातानुकूलित यंत्रणा असल्याने अनेकांनी प्रार्थनास्थळात आराम करणे पसंत केले.

जनावरेही त्रस्त

वाढत्या तापमानामुळे पशूपक्षांसह पशुधनही उकाड्याने त्रस्त दिसून आले. दुभत्या म्हशींसाठी पाण्यात भिजवून अंगावर बारदान टाकण्याची व्यवस्था काही गोठेमालक व शेतकरी यांच्याकडून केली जात आहे. (latest marathi news)

Slow traffic on the city's busy Satana Road
Dhule Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेने प्राण्यांच्या जिवाचीही‌ काहिली

यंत्रमाग कामगारांपुढे अनंत अडचणी

शहरातील बहुसंख्य यंत्रमाग कारखाने प्रामुख्याने पञ्याच्या शेडमध्ये आहेत. यंत्रमाग कामगारांना वाढत्या उष्म्यामुळे काम करताना अडचणी येत होत्या. घामाच्या धारांनी कामगार हैराण झाले होते. एप्रिलच्या पहिल्या दिवशी तापमानाचा तडाखा वाढल्याने आगामी दोन महिने शहर व परिसर भाजून निघणार आहे.

शहरातील तापमान

२६ मार्च ४१ अंश

२७ मार्च ४२ अंश

२८ मार्च ४१.२ अंश

२९ मार्च ४०.२ अंश

३० मार्च ३९.६ अंश

३१ मार्च ३९.४ अंश

१ एप्रिल ४२ अंश

Slow traffic on the city's busy Satana Road
Summer Heat : शरीराला कूल ठेवणारे आरोग्यदायी ‘कुलर’; उन्हाळ्यात कैरी, चिंच गुळाचे पन्हे घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com