Nashik Sukhoi Crash : निफाड तालुक्यात सुखोई कोसळले; शिरसगाव शिवारात घटना; दोन्ही वैमानिक सुरक्षित

Nashik News : दोन्ही वैमानिकांना विमानात बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने ते पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले.
Sukhoi Crash
Sukhoi Crashesakal

Nashik Sukhoi Crash : निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरात एचएएल कंपनीचे 'सुखोई-३०' है लढाऊ विमान ओझर विमानतळ येथील टेस्टिंगसाठी उड्डाण केले, परंतु, काही वेळातच शिरसगाव येथे सुखदेव मोरे यांच्या शेतात ते कोसळले. दरम्यान दोन्ही वैमानिकांना विमानात बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने ते पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले.

दरम्यान यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली, दोन्ही वैमानिकांना उपचारासाठी एचएएल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांचे नाव कैप्टन बोकील आणि विस्वाल असे असून सदर विमान कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला. (Nashik Sukhoi crashed in Niphad Taluka)

Sukhoi Crash
Kolhapur Accident CCTV : भरघाव कारची धडक, सहा- सात गाड्या उडाल्या, तिघांचा मृत्यू

अपघात घडताच तातडीने अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे मदत कार्यासाठी दाखल झाले. यात मोरे या शेतकऱ्यांचे जवळपास 20 लाखांचे नुकसान झालं आहे. त्यांच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण विभागाच्या वीज कनेक्शन तारा देखील नादुरुस्थ झाल्या आहेत.

तर सुखदेव मोरे यांचे घर अवघे 200 फुटावर होते तर पुढे 500 फुटांवर शिरसगाव लोकवस्ती होती. विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच दोन्ही वैमानिकानी गावाची वस्ती टाळत शेताच्या दिशेने विमान नेले, त्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे. अधिक तपास एचएएलचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. (latest marathi news)

Sukhoi Crash
Accident News : बसची ट्रॅक्टरला धडक; एक ठार, १६ गंभीर;सर्व जखमी शेतमजूर हिंगोली जिल्ह्याचे, जालना मार्गावरील दुर्घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com