Dhule Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेने प्राण्यांच्या जिवाचीही‌ काहिली

Dhule Summer Heat : उष्णतावाढीचा परिणाम जनजीवनावर झाला असून, म्हसदीसह परिसरातील वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणीही सैरभैर झाल्याचे चित्र आहे.
Watershed (file photo)
Watershed (file photo)esakal

म्हसदी : उष्णतावाढीचा परिणाम जनजीवनावर झाला असून, म्हसदीसह परिसरातील वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणीही सैरभैर झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २७) दुपारी रणरणत्या उन्हात काळगाव रस्त्यावर दुचाकीस्वारांना वानरांचा कळप सैरभैर होताना दिसला. भर उन्हात मुक्या प्राण्यांची काहिली... दुचाकीस्वारांना खूप काही सांगून गेली. वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांनादेखील उष्माघाताचा त्रास होऊ शकतो हे नाकारता येणार नाही.

वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यंदा सर्वाधिक तापमान असल्याचे मत ज्येष्ठ व्यक्त करत आहेत. अत्यल्प पावसामुळे यंदा म्हसदी भागातील वन‌क्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत. एरवी भक्ष्यासाठी भटकंती करणारे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. भक्ष्य आणि पाण्यासाठी बिबटे गावकुशीकडे धाव घेत असल्याचे वन विभागाने मान्य केले आहे.

ऐन पावसाळ्यातही वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक होते. एरवी शिकारी (सावज)च्या शोधार्थ फिरणारे बिबटे, तडस यांसारखे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. शिवाय वानरे, कोल्हे, ससे यांसारखे प्राणीही आपली तृष्णा कशी भागवत असतील, असा प्रश्न प्राणीप्रेमींनी उपस्थित केला आहे.

वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवारच काय गावकुशीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. काळगाव (ता. साक्री) येथे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वनक्षेत्रालगतच्या हिराळा डोंगरालगत हौद, तर राहूड रस्त्यावर जुन्या हौदात पाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती सरपंच संजय भामरे यांनी दिली.

Watershed (file photo)
Dhule News : नवरंगजवळील कचरा डेपो अखेर बंद!

शोध फक्त पाण्याचा

शेतशिवारात शेतकरी पाळीव प्राण्यांसाठी पाण्याचे हौद बांधून ठेवतात. त्याच ठिकाणी वन्यपशू तहान भागवत असतील हे कोणीही सहज सांगणार आहे. कारण वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नाही. मग अशा वेळी रात्री अंधाराचा फायदा घेत वन्यप्राणी आपली वेळ निभावून नेत असल्याचे वास्तव आहे.

भविष्यात अशीच स्थिती राहिली तर दुर्मिळ, वन विभागाची शान असलेले वन्यप्राणी नामशेष होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यंदा अगदी मार्चच्या आरंभापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सद्यःस्थित तर वन्यपशूंची तहान भागविण्यासाठी रात्रीची भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतशिवारातील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांनी आपली तृष्णा हमखास भागवावी, पण पाळीव प्राण्यावर हल्ला करू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात.

प्राणी, पक्ष्यांचे स्थलांतर

साक्री तालुक्यात हजारो हेक्टर सुरक्षित वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात ससा, हरणे, कोल्हे, लांडगे, तडस, वानरे, बिबटे यांसारखे वन्यपशू, तर मोर, तितर, कबुतरे यांसारखे पक्षी आहेत. यंदा ऐन पावसाळ्यातही पाणवठ्यात पाणीसाठा नव्हता. आज तर कुठेच पाण्याचा टिपूस नाही. पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू महसूल क्षेत्रात येतात किंवा स्थलांतर करतात.

Watershed (file photo)
Dhule News : जिल्ह्यात 41 आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष

स्थलांतर करून ते पशु-पक्षी जातील तर कुठे, हाही प्रश्न आहेच. दर वर्षी वन्यपशूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. जंगल संपत्तीच्या संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांचेही संवर्धन होणे आवश्यक असल्याचे निसर्ग, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

"वनक्षेत्रात पाणी नसल्याने वन्यपशू भटकंती करत असल्याचे चित्र आहे. वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणी शेतशिवारातील पाणवठ्याचा आधार घेत असल्याचे वास्तव आहे."-डी. आर. अडकिने, वनक्षेत्रपाल, पिंपळनेर वन विभाग

"यंदा मार्चच्या आरंभापासून उन्हाची काहिली वाढली आहे. पाण्यासाठी वन्यपशु-पक्षी सैरभैर झाले आहेत. काहींनी स्थलांतर केल्याचे चित्र आहे. वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था केली असती तर स्थलांतर थांबले असते." -विजय निंबा भामरे, काळगाव (ता. साक्री)

Watershed (file photo)
Jalgaon Municipality News : ‘मार्चएंड’मुळे पालिकांची करवसुलीसाठी कसरत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com