Tanishka Activity : नाशिक परिसरात सुरू होणार तनिष्का वृक्ष बँक

Nashik News : नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक वर्षांपासून तनिष्का वृक्षभिशी उपक्रम सदस्यांनी सुरू केला आहे. पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा म्हणून ‘तनिष्कां’तर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
Participating members in Tanishka members' tree almsgiving.
Participating members in Tanishka members' tree almsgiving.esakal

Nashik News : सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठातर्फे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक वर्षांपासून तनिष्का वृक्षभिशी उपक्रम सदस्यांनी सुरू केला आहे. पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा म्हणून ‘तनिष्कां’तर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात तनिष्का वृक्षभिशीची सोडत काढण्यात आली. या सोडतीत कॅनडा कॉर्नर तनिष्का लीडर वैशाली चव्हाण यांची निवड झाल्यानंतर सर्व रोपे त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आली. तनिष्का वृक्षभिशी उपक्रमात सहभागी भगिनी सोडतीच्या दिवशी येताना दोन आपल्या आवडीची रोपे आणतात. या उपक्रमात सोडत काढण्यात येते.

ज्या तनिष्का सदस्याचे नाव सोडतीमध्ये येते, त्यांना सर्व आणलेली रोपे भेट म्हणून दिली जातात. उपस्थित ‘तनिष्कां’तर्फे वैशाली चव्हाण यांचा सत्कार झाला. तनिष्का समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी संयोजन केले. तनिष्का वृक्षभिशीसाठी तनिष्का गटप्रमुख डॉ. सोनाली पाटील, प्राची राव, रूपाली चौधरी, डॉ. उज्ज्वला निकम, सारिका विटोरे, अर्चना पाटील, वंदना देवरे, स्नेहा कदम, वर्षादेवी रौंदळ, वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Participating members in Tanishka members' tree almsgiving.
Nashik Crime News : अट्टल घरफोड्यास निमाणीतून अटक! 3 गुन्ह्यांची उकल

प्रतिनिधींच्या बैठकीत झालेले ठराव

येत्या ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुमारे दहा हजार आंब्याच्या कोयांचे (बी) संकलन करून निसर्गात या कोयांचे रोपण शहरात पुष्पगुच्छ अथवा बुकेचा वापर न करता कार्यक्रमांमध्ये रोप देण्याबाबत जनजागृती करणे.

तनिष्कांच्या वृक्ष बँकेचा प्रारंभ करून या बँकेमार्फत शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी रोपांची उपलब्धता करणे, सोसायट्यामध्ये घनकचरा प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्याबाबत महिलांना प्रशिक्षण देणे, खतनिर्मितीतून रोजगारनिर्मिती करणे.

Participating members in Tanishka members' tree almsgiving.
Nashik Lok Sabha Election : निलंबित शिक्षक, कर्मचारी निवडणूक कामकाजात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com