Nashik News : तपोवनातील मलनिस्सारण केंद्राचे पाणी थेट नदीपात्रात!

Nashik News : तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातून (एसटीपी) मलजलयुक्त पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करता पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले आहे.
Deterioration of the river bed due to the release of water from the sewage treatment plant.
Deterioration of the river bed due to the release of water from the sewage treatment plant.esakal

पंचवटी : तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातून (एसटीपी) मलजलयुक्त पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करता पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले आहे. यामुळे गोदावरी नदीतील जीवजंतू व मासे यांना हानी पोचत आहे. येणाऱ्या पर्यटकांना या भागात दुर्गंधी सामोरे जावे लागते. यातूनच मनपाची गोदावरी नदीबद्दलची अनास्था दिसून येत आहे. तसेच उच्च न्यायालयाचादेखील अवमान होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. (Nashik Tapovan sewage center marathi news)

नाशिक महापालिकेने गोदावरी कृती आराखडाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ७८ एमएलडी प्लांट बांधला आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत ५२ एमएलडीच्या प्लांट तपोवन परिसरात बांधला आहे. असे असतानादेखील परिसरातून जमा झालेल्या मलजल पाण्यावर येथील संपूर्ण प्रक्रिया होत नसल्याने पाणी गोदावरीत सोडले जात आहे.

अशुद्ध पाणी सोडल्याने गोदावरी नदीपात्रात सर्वत्र फेस साचला आहे. हवेमुळे हा फेस उडून रहिवासी परिसरात जात आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना व येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या पाण्यामुळे नदीतील जैवविविधता नष्ट झाली आहे.

स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्लांटपासून पुढे असलेल्या गावांना विषारी पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी संवर्धन कक्ष उभारण्यात आला. गोदावरी नदी व परिसर स्वच्छ ठेवणे, अस्वच्छ करणाऱ्यावर कारवाई करणे आदी सूचना केल्या होत्या. (Latest Marathi News)

Deterioration of the river bed due to the release of water from the sewage treatment plant.
NMC News : महापालिकेत पुन्हा ‘जम्पिंग प्रमोशन’चा घाट; 3 उपअभियंत्यांची फिल्डिंग

मात्र, पुढे तपोवनात असलेल्या मलनिस्सारण केंद्रातून गोदावरीत पूर्ण प्रक्रिया न करता पाणी सोडले जात आहे. या सर्व प्रकारामुळे मनपा अधिकारी कशा पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे हे उघड होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे

पाणी हानिकारक

महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया झाल्यानंतर नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी १० ‘बीवोडी’ असणे आवश्यक आहे. परतू महापालिकेने ३० ‘बीवोडी’साठी डिझाइन केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नदीपात्रात सोडलेल्या पाण्याची तपासणी केली असता ३० बीवोडीच्या वरच आढळून आला आहे. यामुळे नदीपात्रात सोडलेले पाणी हे पात्रातील जीवजंतू व माशांच्या आरोग्यास हानिकारक आहे, असे पर्यावरणप्रेमीचे म्हणणे आहे.

Deterioration of the river bed due to the release of water from the sewage treatment plant.
Vegetables Rates Hike: सर्वच भाज्यांच्या दरांत मोठी वाढ! आठवडे बाजाराला उन्हाचा तडाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com